घरठाणेकल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Subscribe

पुरेसा पाऊस पडेपर्यंत बारवी धरणातील पाणी साठा समप्रमाणात असावा. कल्याण, डोंबिवली शहरांची पाण्याची तहान येत्या तीन महिन्याच्या कालावधीत काटकसर न करता भागवता यावी या उद्देशातून केडीएमसीने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सोमवार, मंगळवारी 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेला विविध जलस्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले.
धरणांमधील आताची पाण्याची उपलब्धता पाहता शहरांना ऑगस्ट अखेरपर्यंत नियमित पाणी पुरवठा करताना 32 टक्के पाण्याची तूट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी ठाणे पाटबंधारे विभागाने उल्हास नदीतील पाणी नियोजनासाठी 9 मे पासून कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा दर सोमवार, मंगळवार येत्या तीन महिन्यांपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असे कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले.
उल्हास नदीवरील बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण पूर्व, पश्चिम, शहाड, वडवली, टिटवाळा, मांडा, आंबिवली, डोंबिवलीला नेतिवली केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -