घरमहाराष्ट्रसंजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? शरद पवार म्हणाले, ज्यांचा लौकीक...

संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? शरद पवार म्हणाले, ज्यांचा लौकीक…

Subscribe

 

सोलापूरः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र हा दावा त्यांच्याच शैलीत फेटाळून लावला.

- Advertisement -

राजीनामा नाट्यानंतर शरद पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. तेथे त्यांनी विठ्ठल साखर कारखान्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत साखर सम्राट अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांची भाजपशीही जवळीक आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाषणात शरद पवार यांनी पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार पाटीलच असतील. तुम्ही तयारीला लागा, असे आदेशच शरद पवार यांनी दिले. त्यामुळे भाजप चिंतेत गेली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पाटील प्रसिद्ध आहेत. या मतदारसंघात भाजपचे समाधान अवताडे आमदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत पाटील हे अवताडे यांना चांगली टक्कर देऊ शकतात.

या कार्यक्रमानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असे शरद पवार यांना विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले, सिरियस बोलण्यात ज्यांचा लौकीक आहे, अशा लोकांना उत्तर द्यावं. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार.

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊत जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश करतील तेव्हा त्यांचे खरे मनसुबे उद्धव ठाकरेंना कळतील. ठाकरेंना तेव्हा कळेल की राऊतांसाठी त्यांनी किती लोकांना तोडलं आहे. शरद पवार यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांना देशभरातील अनेक मोठ्या नेत्यांचे फोन आले पण उद्धव ठाकरेंनी पवार यांना फोन करुन राजीनामा मागे घ्या, असं सांगितल्याचं वृत्त कुठेच आलं नाही, असा दावा नितेश राणे यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी नितेश राणे यांना चांगलाच टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -