घरक्रीडालखनऊच्या पराभवानंतर गुजरात संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित, इतर संघाची स्थिती काय?

लखनऊच्या पराभवानंतर गुजरात संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित, इतर संघाची स्थिती काय?

Subscribe

आयपीएल २०२३ चा १६ वा हंगाम आता दिवसागणिक रंगतदार होत चालला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघाने ५६ धावांनी लखनऊ सुपर जायंट्सवर विजय मिळवला आहे. त्यामुळे गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. गुजरात संघाने ११ सामन्यात ८ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. २२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनऊला१७१ धावांत रोखले. आयपीएलमध्ये गुजरातने लखनऊला चौथ्यांदा पराभूत केलं आहे. लखनऊला गुजरातविरोधात एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

वृध्दिमान साहा आणि शुभमन गिल यांनी गुजरात संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी ४ षट्कात ५३ धावा जोडल्या. रिद्धिमान साहाने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभमन गिलने २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्या २५ धावा करून बाद झाला.

- Advertisement -

शुभमन गिल ५१ चेंडूत ९४ धावा करून नाबाद परतला. डेव्हिड मिलरने १२ चेंडूत नाबाद २१ धावा केल्या. त्यामुळे गुजरातने लखनौला २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, हे आव्हान पूर्ण करत असताना लखनऊला पराभवाला सामोरे जावे लागले.

इतर संघाची स्थिती काय?

- Advertisement -

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई यांची प्लेऑफमध्ये पोहचण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता सर्वात कमी आहे.

गुजरात टायटन्स, GT – 91%
चेन्नई सुपर किंग्ज, CSK – 78%
लखनऊ सुपर जायंट्स, LSG – 58%
राजस्थान रॉयल्स, RR – 42%
मुंबई इंडियन्स, MI – 36%
रॉयल चॅलेंजर बंगळुरू, RCB – 34%
पंजाब किंग्ज, PBKS – 31%
कोलकाता नाइट रायडर्स, KKR – 12%
दिल्ली कॅपिटल्स, DC – 11%
सनरायझर्स हैदराबाद, SRH – 4%


हेही वाचा : गौतम झाला पुन्हा ‘गंभीर’, विराटने बीसीसीआयला दिलेल्या पत्रानंतर वाद वाढण्याची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -