घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ओळख नाही, कर्नाटकात कोण ओळखणार; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

महाराष्ट्रात ओळख नाही, कर्नाटकात कोण ओळखणार; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका

Subscribe

 

साताराः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही. त्यांना कर्नाटकमध्ये कोण ओळखणार, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला आहे. सातारा जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. काही मुद्दे कळीचे ठरत आहेत. बारसू प्रकल्पाचा मुद्दा चिघळत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे कर्नाटकात प्रचाराला गेले आहेत. त्यांना कोण ओळखत कर्नाटकात?, महाराष्ट्रात त्यांना कोण ओळखत नाही. तेथे त्यांना कोण ओळखणार आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकार हे भ्रष्टाचारी आहे. बदल्यांसाठी त्यांचा रेट ठरला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला.

सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. येथे मनगट तोडण्याचे काम सुरू आहे. अशी परिस्थिती येथे असेल तर सरकार काय झोपा काढतंय का?. कोरेगावमध्ये पोलीस निरीक्षक पदी यायला कोणी अधिकारी तयार होत नाही, असे चित्र आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. तेव्हा असे घडत नव्हते. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

- Advertisement -

माझ्या बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. प्रकल्पही परराज्यात गेले, यांनी ते प्रकल्प थांबवण्यासाठी काहीही केलेलं नाही. नवीन प्रकल्प आणण्याची धमक यांच्यातही नाही. ७५ हजार मुला-मुलांना नोकऱ्या लावणार असं राज्य सरकारनं सांगितलं होतं?, त्याचं काय झालं. काहीही नाही. त्या मंत्रालयात बसायला कुणीही तयार नाही. अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मदत पुरवली जात नाही. आमचं सरकार असतं तर ७ कोटीपर्यंत आमदार निधी गेला असता, असं पवार म्हणाले.

आज मंत्री तर अक्षरश: कुणालाच विचारत नाहीत. मंत्रालयात बसत नाहीत. वेगवेगळी लोकं बाजारात फिरतायत. खालच्या पातळीचे शब्द हे मंत्र्यांकडून वापरले जातात. महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करण्याचं काम हे राज्यपालांसह राज्यकर्त्यांनी केलं. कुणीही त्यांना आवरलं नाही. आपण मोर्चे काढत आंदोलनं देखील केली. यापूर्वी असं कधी घडलं होतं का?, परंतु यांच्या काळात या सर्व गोष्टी घडल्या, असं अजित पवार म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -