घरपालघरपंप लावून पाणी चोरणार्‍यांवर कडक कारवाई

पंप लावून पाणी चोरणार्‍यांवर कडक कारवाई

Subscribe

त्याअनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार अनधिकृतपणे पाणी खेचणार्‍या विद्युत पंप जप्त करण्याची मोहिम पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आली असून अनेक पंप जप्त करण्यात आले आहेत.

भाईंदरः मीरा -भाईंदर शहरात पंप लावून पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पाणी पुरवठा विभागाने छापेमारी करून पंप जप्त करण्याची मोहिम हाती घेतली आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी आयुक्तांनी अशा सोसायट्यांकडून प्रत्येक पंपामागे ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.

मीरा-भाईंदर शहरास स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन न्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. यांच्याकडून ८६ द.ल.लि. व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडाळ यांच्याकडून १२५ द.ल.लि.असा एकूण २११ द.ल.लि. पाणी पुरवठा मंजूर आहे. परंतु शहरास सद्यस्थितीत प्रत्यक्षात सरासरी १८५ ते १९० द.ल.लि. पाणी पुरवठा होत असून सध्याच्या लोकसंख्येनुसार जवळपास २१६ द.ल.ली. पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच पाण्याच्या मागणीपेक्षा जवळपास सरासरी २६ ते ३१ द.ल.ली प्रतिदिन पाणी पुरवठा कमी होत आहे. पाणी पुरवठा विभागाच्या पाहणी दरम्यान बहुतांश गृहनिर्माण संस्थांनी महापालिकेच्या जलजोडणीस विद्युत पंप लावला असून त्याव्दारे मनपाच्या वितरण व्यवस्थेतून पाणी बेकायदेशीररित्या खेचण्यात येत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यामुळे बर्‍याच सोसायट्यांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्याबाबतच्या तक्रारी पाणी पुरवठा विभागात प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार अनधिकृतपणे पाणी खेचणार्‍या विद्युत पंप जप्त करण्याची मोहिम पाणी पुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आली असून अनेक पंप जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मीरा-भाईंदर शहरामधील ज्या परिसरातील इमारतींनी विद्युत पंप लावलेले आहेत. त्या परिसरात पाणी कमी दाबाने व कमी प्रमाणात इतर इमारतींना जाते. त्यामुळे सदर इमारती,सोसायट्या पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. परिणामी शहरातील वितरण व्यवस्थेच्या नियोजनावर परिणाम होऊन वितरण व्यवस्था विस्कळीत होते. त्याकरता विद्युत पंप लावत असलेल्या सोसायट्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने विद्युत पंप जप्त केल्यानंतर संबंधित इमारती आणि गृहनिर्माण संस्थांकडून जलजोडणीस विद्युत पंप लावणार नाही, असे शपथपत्र घेण्यात येणार आहे. तसेच सर्व नळजोडण्या खंडीत करून प्रत्येक विद्युत पंपामागे पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -