घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपालकांनो तुमची मुल पण ऑनलाईन बेटींगच्या जाळ्यात तर नाहीत ना...? ; मुले...

पालकांनो तुमची मुल पण ऑनलाईन बेटींगच्या जाळ्यात तर नाहीत ना…? ; मुले नैराश्याच्या फेर्‍यात

Subscribe

बक्षिसांच्या आमीषाने अनेकांची बँक खाती रिकामी

 नाशिक : सध्या देशभरात आयपीएलचे (ipl) वारे वाहत असल्याने ऑनलाईन मोबाईल अ‍ॅप्स आणि काही वेबसाईट्सवरुन ऑनलाईन जुगारही (online gambling) जोरदार सुरू आहे. या जुगाराच्या जाळ्यात शेकडो किशोरवयीन मुले सापडले आहेत. दुर्दैव म्हणजे यातील अनेकांनी लॉगइन करताना आई किंवा वडिलांच्या क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती दिल्याने त्यांची बँक खातीही रिकामी होत आहेत. आर्थिक फटका बसल्याने आलेल्या नैराश्यातून अनेक किशोरवयीन मुलांवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

ऑनलाईन सट्ट्यावर 50 रुपयांची बोली लावून 2 कोटींपर्यंतची रक्कम आणि आयफोनसारखे महागडे मोबाईल जिंकण्याचे

- Advertisement -

आमीष दाखवले जाते. या लालसेपोटी किशोरवयीने मुले आपल्या आईवडीलांची कागदपत्रे आपलोड करून हा खेळ खेळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ऑनलाईन सट्ट्यात कमीत कमी 19 रुपयांपासून आपण टीम तयार करू शकतो. या खेळासाठी प्रथम पॅन आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागले. वापरकर्त्याचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तरच हा खेळ खेळता येतो. आपले खाते तयार झाल्यावर आपल्याला ज्या स्पर्धेत (काँटेस्ट) सहभाग घ्यायचा तो पर्याय निवडून आपला 11 खेळाडूंचा एक संघ तयार करावा लागतो. यात त्या दिवशी सामना असणार्या दोन्ही संघांतून आपण खेळाडू निवडू शकतो. यात विकेटकीपर, बॉलर, ऑलराऊंडर आणि बॅट्समनचा समावेश असतो. त्यानंतर एक कॅप्टन आणि दुसरा उप कॅप्टन निवडायचा असतो. यात अभ्यासपूर्ण विश्लेषणातून आपण एक मजबूत संघ तयार करायचा असतो. आपण निवडलेल्या खेळाडूने त्या सामन्यात चांगली कामगिरी केली तर आपण यात विजेते ठरतो.

यात आपल्याला एकापेक्षा अधिक संघदेखील तयार करता येतात. जिंकण्याच्या लालसेपोटी मुले विविध शक्यता डोळ्यांपुढे ठेवून शेकडो संघ तयार करतात. अगदी छोटी रक्कम जिंकली तर आणखी मोठी रक्कम मिळण्याच्या अपेक्षेने अधिकाधिक संघ तयार करून हजारो रुपये त्या संघांवर लावतात. एखाद्या खेळाडूने चांगले प्रदर्शन केले नाही तर आपले सर्व पैसे बुडतात आणि आर्थिक फटक्याचा थेट मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

- Advertisement -

आईवडिलांना समजू न देता त्यांच्या क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करून ही किशोरवयीन मुले या खेळाच्या आहारी जात आहेत. याबाबत आपलं महानगरने सायबर पोलिसांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीवरून या खेळाला भारतात मान्यता आहे आणि यात आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे मुलांना यापासून दूर ठेवायचे असेल तर पालकांनी त्यांच्यावर लक्ष देवून सुसंवाद ठेवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

या खेळात केवळ तरुणच नाही तर अनेक ज्येष्ठ नागरिकही अडकले आहेत. यातून नागरिकांना आर्थिक व मानसिक नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे विविध स्तरातून अशा ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली होत असेलेली सट्टेबाजी व टीव्हीवरुन होणारे त्यांच्या जाहिराती बंद कराव्यात, अशी आग्रही मागणी पुढे येऊ लागली आहे. या खेळात अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून योग्य समुपदेशन करुन काही काळासाठी मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवले पाहिजे. यामुळे त्यांचे मन स्थिर होवून मानसिक आरोग्य सुधारू शकते.

सरकारी यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत

फक्त ड्रीमच नव्हे तर शेकडो ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्स सक्रीय आहेत. त्यामुळे देशात अचानक कर्जबाजारी लोक आणि मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील नामवंत डॉक्टर्स आणि तज्ज्ञांनी ही बाब अनेकवेळा सरकारच्या निदर्शनात आणून दिली तरीही मिळणार्या कररुपी महसूलामुळे सरकारी यंत्रणादेखील केवळ बघ्याच्याभूमिकेतआहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -