घरताज्या घडामोडीKarnataka Cabinet Expansion: कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार, 'या' २४ मंत्र्यांनी घेतली शपथ

Karnataka Cabinet Expansion: कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार, ‘या’ २४ मंत्र्यांनी घेतली शपथ

Subscribe

कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्नाटकात आता नवे मंत्री तयार करण्यात आले आहेत. यावेळी २४ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शपथ घेतली आहे. आता राज्य मंत्रिमंडळात एकूण ३४ मंत्री आहेत.

२० मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह १० मंत्र्यांचा शपथविधी झाला होता. या सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली होती. काँग्रेसचे नेते एचके पाटील, कृष्णा बायरे गौडा यांनी मंत्रीपदाची तसेच गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत इतर २२ जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी?

- Advertisement -

कर्नाटकात काँग्रेसच्या २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये दिनेश गुंडुराव, शरणबसप्पा दर्शनापुर, एचके पाटील, कृष्णा बायरे गौडा, एन चेलुवरायस्वामी, के. वेंकटेश, शिवानंद पाटील, तिम्मापुर रामप्पा बलप्पा, एसएस मल्लिकार्जुन, तंगदगी शिवराज संगप्पा, डॉ. एचसी महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, क्याथासंद्रा एन राजन्ना, डॉक्टर शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, संतोष एस लाड, एनएस बोस राजू, सुरेश बीएस, मधु बंगारप्पा, डॉक्टर एमसी सुधाकर, मंकल वैद्य, लक्ष्मी आर हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर आणि बी नागेंद्र यांचा समावेश आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आज ज्या २४ मंत्र्यांना पदाची शपथ देण्यात आली. त्यामध्ये ६लिंगायत, ४ वोक्कलिगा, ३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमाती आणि ५ कुरुबा, राजू, मराठा आणि मोगवीरा आदी समाजातील आहेत.


हेही वाचा : नितीश कुमारांना उशिरा सुचलेले शहाणपण, विचारतात – वेगळ्या संसद भवनाची गरज काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -