घरमहाराष्ट्रदहावी शिकलेल्या रविंद्र चव्हाण यांना वैद्यकीय शिक्षण खातं कसं? - अजित पवार

दहावी शिकलेल्या रविंद्र चव्हाण यांना वैद्यकीय शिक्षण खातं कसं? – अजित पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कल्याण येथे परिवर्तन यात्रेच्या दरम्यान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हान यांच्या टीका केली आहे. रविंद्र चव्हाण हे सध्या माहिती व तंत्रज्ञान आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्रीपद सांभाळत आहेत. त्याचबरोबर बंदरे, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्यांचेही राज्यमंत्रीपद सांभाळत आहेत. अजित पवार यांनी चव्हाण यांच्या पदवीवरुन त्यांच्यावर टीका केली आहे. रविंद्र चव्हाण यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणूकांवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपलं शिक्षण दहावी पास असं नमूद केलं होतं. आता याच मुद्यावर अजित पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तनाचा या कार्यक्रमाअंतर्गत अजित पवार यांनी कल्याण येथे रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – रायगडावरील महाराजांच्या दर्शनाने राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार सोमवारी निर्धार परिवर्तनाचा यात्रेअंतर्गत सोमवारी कल्याण येथे आले होते. यावेळी त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी भाजप सरकारमधील नेत्यांच्या पदव्या बोगस असल्याचेही म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, ‘रविंद्र चव्हाण हे दहावी शिकलेत आणि त्यांना खातं कोणतं दिलंय, तर वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काय डोंबल कारभार करणार? यांच्यातल्या मंत्र्यांची डिग्री बोगस आहे’.

हेही वाचा – भाजप सरकारला जमिनीवर आणण्यासाठी सज्ज व्हा -छगन भुजबळ

- Advertisement -

निर्धार परिवर्तन मोहीम

निर्धार परिवर्तन या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्यभर फिरत आहेत. या यात्रेला परिवर्तन यात्रा असेही म्हटले जात आहे. राज्यभर फिरुन राष्ट्रवादी भाजप सरकारवर टीका करत आहेत. याच मोहिमेअंतर्गत अजित पवार यांनी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -