घरमहाराष्ट्रपुणेPMOतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा पुण्यात सर्रास वावर, IASवर संशय आला आणि जेलमध्ये गेला

PMOतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा पुण्यात सर्रास वावर, IASवर संशय आला आणि जेलमध्ये गेला

Subscribe

तोतया IAS अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. पुणे पोलिसांनी तोततया IAS अधिकाऱ्याला अटक करुन चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव निवृ्त्ती तावडे ( वय 54 रा. फ्लॅट नं 336, रानवार रोहाऊस तळेगाव दाभाडे,) असा त्या तोतया आयएस अधिकाऱ्याचे नाव आहे.

तोतया IAS अधिकाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे. पुणे पोलिसांनी तोततया IAS अधिकाऱ्याला अटक करुन चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव निवृ्त्ती तावडे ( वय 54 रा. फ्लॅट नं 336, रानवार रोहाऊस तळेगाव दाभाडे,) असा त्या तोतया आयएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ( Maharashtra Pune fake IAS officer arrested by Pune Police who told he came from PMO Office )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील औंध भागात पुणे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी पाठवण्याकरता रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी वासुदेव तायडे त्याने त्याचे नाव डॉक्टर विनय देव असं सांगितलं. ते स्वत: आयएएस पदावर असून सध्या त्यांची ड्यूटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालयात असून ते गोपनीय काम करत असतात असं सांगितलं.

- Advertisement -

पोलिसांना त्याचा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला नीट उत्तर देता आली नाहीत. चौकशीअंती पोलिसांनी वासुदेव निवृत्ती तायडे याला ताब्यात घेतलं. चतुर्श्रुंगी पोलसी ठाणे येथे तायडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी सिंध हौसिंग सोसायची, औंध येथे बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी पाठवण्याकरता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एकजण पीएमओ ऑफिसमधून आल्याचं म्हणाला, परंतु त्याच्या आयएएस पदाबाबत पदाधिकाऱ्यांना संशय वाटला. त्यामिळे त्यांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित माहितीच्या आधारे डॉक्टर विनय देव याचा शोध घेत त्याला तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेतलं.

- Advertisement -

( हेही वाचा: Pune Crime News : पुण्यात प्रेयसीनं प्रियकराला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर )

ही कामगिरी रितेश कुमार पोलीस आयुक्त, संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, अमोल झेंडे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, सुनील पवार सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सपोनिरी कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे या पथकाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -