घरमनोरंजनउर्फी जावेदच्या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

उर्फी जावेदच्या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Subscribe

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. अशातच, उर्फीचा नव्या लूकमधील अतरंगी फोटो समोर आले आहेत. पण उर्फीच्या या लूकला अनेकांनी खूप क्युट म्हटलं आहे.

उर्फी जावेदच्या नव्या लूकचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नेहमी अतरंगी कपडे परिधान करणाऱ्या उर्फीने आज खूप क्युट लूक केला होता. यात उर्फीने लाइट यलो कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने कलरफुल सॉफ्ट टॉयज जॅकेट परिधान केले होते.

- Advertisement -

मऊ खेळण्यांपासून बनवलेले जाकीटया टॉयज जॅकेट सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उर्फीचे हे बहुरंगी जॅकेट मऊ खेळण्यांपासून बनवले होते. हे ब्लेझर डिझाइन लहान टेडीज एकत्र जोडून केले गेले, ज्यामध्ये हिरवा, पिवळा, निळा, नारंगी, तपकिरी, राखाडी आणि हलका गुलाबी रंगांचा समावेश आहे. उर्फीचा हा क्यूट लूक सर्वांनाच आवडला. अनेकांनी नेटकऱ्यांनी उर्फीचं कौतुक केलं तर काही सेलिब्रिटींनीही उर्फीच्या या लूकवर कमेंट्स करुन कौतुक केले आहे.


हेही वाचा :

रणवीर सिंह झळकणार हॉलिवूडमध्ये; विलियम मॉरिस एंडेव्हरसोबत केला करार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -