घरताज्या घडामोडीVande Bharat Train: ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे 'वंदे भारत'चा लोकार्पण सोहळा रद्द

Vande Bharat Train: ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द

Subscribe

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ (Vande Bharat Train) एक्स्प्रेसचे लोकार्पण उद्या(शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. परंतु ओडिशातील (Odisha) एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे वंदे भारतचा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, यासंदर्भात मुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे एल.के.वर्मा यांनी माहिती दिली आहे.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला उद्या सकाळी साडेदहा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सींच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार होते. तसेच मडगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार होता. परंतु ओडिशातील एक्स्प्रेस दुर्घटनेमुळे ‘वंदे भारत’चा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

उद्यापासून कोकण रेल्वे मार्गावर मुंबई-सीएसएमटी ते मडगाव वंदे भारत ट्रेन धावणार आहे. त्यामुळे कोकणवासियांमध्ये आधीपासूनच आनंदाचे वातावरण आहे. पण आता कोकणवासियांसाठी आणि विशेष करून सिंधुदुर्गवासीयांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. वंदे भारत ट्रेनला कणकवली स्थानकावर थांबा देण्यात यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रम असलेल्या या गोष्टीबाबत आता स्पष्टता मिळाली असून वंदे भारत ट्रेनला कणकवलीत थांबा देण्यात आलेला आहे.

वंदे भारत ट्रेनला कणकवली रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. तर आमदार नितेश राणे हे या मागणीचा सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळे त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे नितेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे वंदे भारत आता कणकवली स्थानकातही थांबणार असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : आनंदाची बातमी! कोकणवासीयांची गणपतीवारी सुखकर; वंदे भारतला कणकवलीत थांबा

कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात

ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. ओडिशामधील बालासोर जिल्ह्यातील बहानागा रेल्वेस्थानाच्या जवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत २००हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मोबाईलच्या फ्लॅशमध्ये बचावकार्य केलं जात आहे. अपघातामुळे या मार्गावरील सर्व ट्रेन्स थांबवण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : Odisha Train Accident : कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात, २००हून अधिक प्रवासी जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -