घरनवी मुंबईअनिल डिग्गीकर सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक; सहव्यवस्थापकीय संचालकपदी शंतनू गोयल

अनिल डिग्गीकर सिडकोचे नवीन व्यवस्थापकीय संचालक; सहव्यवस्थापकीय संचालकपदी शंतनू गोयल

Subscribe

नवी मुंबईः  सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे अनिल डिग्गीकर यांनी  सोमवारी सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांच्याकडून स्वीकारली. सिडकोचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या मुंबईतील ‘निर्मल’ येथे अनिल डिग्गीकर यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली.तर सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या शंतनू गोयल यांनीही आपला पदभार स्वीकारला.

अनिल डिग्गीकर हे 1990 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. डिग्गीकर यांनी 1990 मध्ये रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकारी पदे भूषविली. सन 1992-1994 मध्ये लातूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोलाची कामगिरी केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, पुणे येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.

- Advertisement -

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी डिग्गीकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. विविध लोकाभिमुख वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कृतिशील प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. शंतनु गोयल हे 2012 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असून सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते नागपूर येथे मनरेगाच्या आयुक्तपदी कार्यरत होते.

शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

IAS Officer Transfer शिंदे सरकारने २० सनदी अधिकाऱ्यांच्या गेल्या शुक्रवारी बदल्या केल्या. मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांची गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदी बदली करण्यात आली आहे. नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेले तुकराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्वरीत पदभार स्विकारावा, असे फर्मान सामान्य प्रशासन विभागाने जारी केले. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे, चंद्रकांत पुलकुंडवार, इड्जेस कुंदन, संजीव जयस्वाल, कादंबरी बलकवडे आणि मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांच्यासह २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले.

- Advertisement -

आमदार काय काय मागतात तुम्हाला सांगता येणार नाही; अजित पवारांचा टोला

आमदार काय काय मागतात हे तुम्हाला सागंता येणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. अजित पवार म्हणाले, बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला हे असा आरोप होतो आहे. तेथे पुण्यात तर दलाल लोकं बसलेलेच आहेत. अधिकारी वर्ग पण दबक्या आवाजात बोलत आहे. या सरकारमध्ये कणखरपणा नाही. पारदर्शकता नाही. भ्रष्टाचार बोकळला आहे. माझ्याकडे पुरावे आले की मी मांडनेच. विधानसभेत आवाज उठवेन.  कर्नाटकात अशाच प्रकारे भ्रष्टाचार वाढला होता. जनतेने सत्ताधाऱ्यांना फेकून दिलं. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -