घरमनोरंजनस्वरा भास्करने दिली गुड न्यूज; बेबी बंपसह शेअर केला फोटो

स्वरा भास्करने दिली गुड न्यूज; बेबी बंपसह शेअर केला फोटो

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील काही महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकले. तेव्हापासून स्वरा भास्करच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. स्वरा आणि फहादचे लग्न अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. दरम्यान, अशातच आता स्वराने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. स्वराने तिच्या इंस्टाग्रामवर पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिचे बेबी बंप देखील दिसत आहे.

स्वराने दिली गुड न्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती सपा नेता फहाद अहमद 16 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. त्यावेळी त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर मार्चमध्ये कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थित त्यांनी धूमधडाक्यात लग्न केले. दरम्यान, आता लग्नाच्या 5 महिन्यातच स्वराने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. स्वराने बेबी बंपसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, “कधी-कधी तुमच्या सर्व प्रार्थनांचे उत्तर देव एकत्र देतो.” तसंच तिने यावेळी तिचं बाळ ऑक्टोबरमध्ये जन्माला येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर स्वरा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. लग्नानंतर काही महिन्यांनीच ती आई झाल्याचेही काहींनी सांगितले होते.

- Advertisement -

कोण आहे फहाद जिरार?

स्वरा भास्करने फहाद जिरार अहमदसोबत फेब्रुवारी पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा :आलियाने केलं लैंगिक समानतेवर भाष्य; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -