घरपालघरमहापालिका उद्यानाचीही भिंत कोसळली

महापालिका उद्यानाचीही भिंत कोसळली

Subscribe

खेळण्याचे साहित्य मातीखाली दबून मोठे नुकसान झाले आहे. बाजूलाच लाईटची मुख्य डिपी आहे. माती खचून त्याचेही नुकसान होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

वसईः विरार पूर्वेकडील सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरु असताना पंधरा फूट उंचीची भिंत कोसळून मंगळवारी तीन मजूर महिला मृत्युमुखी पडल्या होत्या. ही घटना ताजी असताना गुरुवारी याच साईटला लागून असलेल्या महापालिकेच्या मातृछाया उद्यानाची संरक्षक भिंत कोसळल्याने घबराट पसरली आहे. मंगळवारी दुपारी सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचा बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पंधरा फूट उंचीची भिंत कोसळून त्याखाली दबून तीन मजूर महिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या साईटला लागूनच असलेल्या महापालिकेच्या मातृछाया उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली. भिंत कोसळल्याने उद्यानात असलेली बाकडे व खेळण्याचे साहित्य मातीखाली दबून मोठे नुकसान झाले आहे. बाजूलाच लाईटची मुख्य डिपी आहे. माती खचून त्याचेही नुकसान होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

मंगळवारची दुर्घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. एकतर महापालिका उद्यानाच्या संरक्षण भिंतीला लागूनच इमारती बांधण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी तीस ते चाळीस फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. खड्डा खोदल्यावर सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली न गेल्याने तीन निष्पाप मजूर महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. महापालिकेने त्याकडे वेळीच लक्ष दिले असते तर उद्यानाची संरक्षण भिंत वाचली असती असे जाणकारांचे म्हणणे आहे. सुदैवाने भिंत कोसळली तेव्हा मुले उद्यानात नसल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, मजूर महिलांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि ठेकेदाराला अटक केली आहे. तर आर्किटेक्ट फरार झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -