घरटेक-वेकया 'व्हिडिओ'जना युट्यूबकडून बसवणार चाप

या ‘व्हिडिओ’जना युट्यूबकडून बसवणार चाप

Subscribe

येत्या काळात युट्यूबवर व्हायरल होणारे व्हिडिओ होणार गायब.

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं. जगभरात मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅप, फेसबुक आणि युट्यूब हल्ली तरुणांमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाते. त्यामुळे एखादी फेक न्युज किंवा फेक कन्टेंट देखील वाऱ्यासारखा पसरतो. मात्र याला आळा बसावा याकरता आता युट्यूबने धरती गोलाकार नाहीच, चंद्रावर कधी माणसाने पाऊल ठेवलंच नाही अशा आशयाचे आणि खोटी माहिती देणारे व्हिडिओ यापुढे पाहता येणार नाहीत. खोट्या बातम्यांना आळा बसावा याकरता युट्यूबने ठोस पावलं उचलली असून या व्हिडिओजला युट्यूब येत्या काळात चाप बसवणार आहे.

याकराणांसाठी घेण्यात आला निर्णय

गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूबवर असणाऱ्या व्हिडिओमुळे अनेकांची दिशाभूल होत होती. खोटी माहिती देणारे अनेक व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल होत असल्याने युजर्सशी दिशाभल होत होती. तसेच या व्हिडिओमुळे अनेक गैरसमज देखील पसरत होते. या कारणांमुळे युट्यूबने अशा व्हिडिओला बंदी घातल्याण्याचा निर्णय घेतला. येत्या काळात हे व्हिडिओ युट्यूबवर दिसणार नाहीत. तसेच रेकंमेडेशन सेक्शनमध्ये युट्यूब काही महत्त्वपूर्ण बदल करणार आहेत. ज्या व्हिडिओजमध्ये असा आशय आढळेल त्या व्हिडिओजला यापुढे रेकमेंड न करण्याचा निर्णय युट्यूबने घेतला आहे. तेस बदलही युट्यूबच्या सेटिंगमध्ये करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या व्हिडिओजचे प्रमाण सध्या १ टक्का

सध्या अशा व्हिडिओजचे युट्यूबवर प्रमाण १ टक्का असले तरी देखील युट्यूबवर रोज अपलोड होणाऱ्या कोट्यावधी व्हिडिओजची संख्या पाहता हा आकडाही बराच मोठा आहे. फक्त सोशल नेटवर्किंग साइट्सच नाही तर अन्य राष्ट्रांनीही फेक न्यूजवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. तर भारत अशा खोट्या बातम्यांवर केव्हा घालणार हे पाहण महत्त्वांच ठरणार आहे.


वाचा – युट्यूबमुळे रेयान झाला मालामाल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -