घरमुंबईनमाज पठण करतेवेळी चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांना अटक

नमाज पठण करतेवेळी चोरी करणाऱ्या भुरट्या चोरांना अटक

Subscribe

कांदिवली आणि बोरिवली परिसरातील मशीदींमध्ये नमाज पठण करतेवेळी मोबाईल आणि पाकिट चोरी करणाऱ्या दोन भुरट्या चोरांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्हीची मदतीने या चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

कांदिवली पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक केली आहे. हे भुरटे चोर परिसरातील मशीदींमध्ये घुसून चोरी करायचे. नमाज पठण करतेवेळी हे चोर लोकांचे मोबाईल आणि पाकिट चोरत होते. मागील अनेक दिवसांपासून त्यांनी या परिसरातील मशिदींमध्ये चोऱ्या करत असत. नमाज पठण करताना खाली वाकल्यावर हे भुरटे चोर सामान चोरून पसार होत होते. सीसीटीव्हीच्या आधारावर या चोरांना अटक करण्यात आली. मशीदीत चोरी होत असल्याच्या घटना वारंवार होत असल्यामुळे येथील स्थानिकांंनी कांदिवली पोलिसांकडे याची तक्रार केली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपाला तेव्हा या चोरट्यांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसले

सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक चोर लाल कपडे घालून मस्जिदमध्ये प्रवेश करताना दिसत होता. नंतर मशीदीत एकटा सर्व परिसराची रेकी करताना दिसतोय. सगळेजण नमाज पढण्यासाठी खाली वाकताच ते बॅगा घेऊन पसार होतात. विशेष म्हणजे ही चोरी करण्याच्या अगोदर ते “अल्ला भगवान आम्हाला माफ कर आणि पकडले जाण्यापासून वाचव.”अशी प्रार्थना करत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

- Advertisement -

धारावी परिसरातून केली अटक

कांदिवली पोलिसांनी या दोघांनाही धारावी परिसरातून अटक केली असून गुड्डू बुल्लू अंसारी, (वय-२५) आणि इसरार यूनुस खान, (वय-४०) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनीही कुर्ला , मालवणी, कांदिवली अश्या अनेक हायप्रोफाईल मशीदींमध्ये  चोऱ्या केलेल्या आहेत. या दोघांकडून ६ महागडे मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -