घरमनोरंजन'मणिकर्णिका वाद : सहदिग्दर्शकाचा कंगनावर थेट आरोप

‘मणिकर्णिका वाद : सहदिग्दर्शकाचा कंगनावर थेट आरोप

Subscribe

'मी नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेत कंगनाने चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं संपूर्ण श्रेय लाटले', असा गंभीर आरोप क्रिशने केला आहे. 

कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी, चित्रपटाशी निगडीत वाद काही थांबताना दिसत नाही. 
सूत्रांनुसार, कंगनाशी वाद झाल्यामुळे क्रिशने ‘मणिकर्णिका’ चित्रपट अर्ध्यातच सोडला होता. क्रिशने मुलाखतीत खुलासा केल्याप्रमाणे, त्याने चित्रपटाचं ७० ते ८० टक्के शूटिंग पूर्ण केलं होतं. शूटिंग पूर्ण करुन क्रिशने एनटीआर यांच्या बायोपिकवर काम सुरु केले. दरम्यान, याविषयी त्याच्यामध्ये आणि कंगनामध्ये झालेल्या करारानुसार क्रिशच्या पश्च्यात उरलेलं ३० टक्के फायनल पॅचचं काम कंगनाच पूर्ण करणार होती. मात्र, ‘मी नसल्याच्या संधीचा गैरफायदा घेत कंगनाने चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं संपूर्ण श्रेय लाटले’, असा गंभीर आरोप क्रिशने केला आहे.

पाहा : मणिकर्णिकातून वगळलेला सोनूचा ‘तो’ सीन झाला लिक…

याविषयी खुलासा करताना क्रिश म्हणाला की, ‘माझे दिग्दर्शनाचे काम पूर्ण झाल्यानंतर अंतिम पॅचवर्कमध्ये कंगना पूर्ण करणार होती. उरलेले शूट ४-५ दिवसांत पूर्ण करुन त्याविषयी माहिती देईन, असं कंगनाने मला सांगितलं होतं. मात्र, असे काहीच घडले नाही. माझ्या अनुपस्थितीत कंगनाने तिला हवे ते सीन चित्रपटातून वगळले तर काही सीन पुन्हा शूटही केले.’ ‘अखेर चित्रपट रिलीज होतेवेळी कंगनाने दिग्दर्शनाचे संपूर्ण श्रेय लाटले’, असा आरोप क्रिश याने केला आहे.
मात्र, कंगनाची बहिण आणि मॅनेजर रंगोली रनौत हिने या आरोपांचे खंडन केले आहे. ‘कंगनाने चित्रपटाचा बहुतांशी भाग स्वत:च दिग्दर्शित केला असून, तिने अन्य कोणाचेही श्रेय लाटले नाहीये. त्यामुळे तिच्यावर आरोप लावणाऱ्यांनी १० वेळा विचार करावा’, असा अप्रत्यक्ष सल्ला रंगोलीने कंगनाला दिला आहे. दरम्यान, या वादाचा परिणाम चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी होतो आहे हे नक्की.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -