घरक्रीडाभारताला झुंज देण्यात ठरतोय अपयशी

भारताला झुंज देण्यात ठरतोय अपयशी

Subscribe

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले तिन्ही सामने जिंकत ५ सामन्यांची ही मालिका आपल्या खिशात घातली. न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूने या मालिकेत सातत्यपूर्ण प्रदर्शन केलेले नाही. तीन सामन्यांत मिळून त्यांच्या अवघ्या चार फलंदाजांना अर्धशतके करता आली आहेत. तर, गोलंदाजही विकेट घेण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे भारताने आमच्यापेक्षा सगळ्या स्तरांत चांगला खेळ केला आहे आणि आमचा संघ त्यांना झुंज देण्यात अपयशी ठरतोय असे न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर म्हणाला.

आम्ही ही मालिका ३-० गमावली आहे हे स्वीकारणे खूप कठीण आहे. पण, भारताने या मालिकेत खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. ते तिन्ही सामन्यांत आमच्यापेक्षा चांगले खेळले. त्यांनी आमच्यावर दबाव बनवून ठेवला आणि योग्यवेळी विकेट घेतल्या. आम्हाला जेव्हा वरचढ होण्याची संधी होती तेव्हा मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी विकेट घेतल्या. दुसर्‍या सामन्यात २० षटके बाकी असताना आम्ही ३-४ विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे आम्ही सामन्यात मागे पडलो. आम्ही या सामन्यात झुंज देण्याचा प्रयत्न केला पण त्यात आम्ही अपयशी ठरलो, असे टेलर म्हणाला.

- Advertisement -

भारत आम्हाला खूप काही शिकवत आहे – विल्यम्सन

तिसर्‍या सामन्यातील पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन म्हणाला, भारताचा संघ खूपच अप्रतिम आहे. ते आम्हाला खूप काही शिकवत आहेत. त्यांनी आमच्याविरुद्ध ज्या योजना आखल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला ज्याप्रकारे चुका करण्यासाठी भाग पाडले आहे, त्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -