घरमनोरंजनहिमानी शिवपुरी हसते रहो

हिमानी शिवपुरी हसते रहो

Subscribe

डेव्हीड धवन यांनी जेवढ्या म्हणून चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यात हमखास एक अभिनेत्री दिसलेली आहे, ती म्हणजे हिमानी शिवपुरी. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून पदवी घेतल्यानंतर कलाकार हा सर्वच प्रकारच्या भूमिका साकारण्यात सराईत होतो. पण हिमानी ही विनोदी भूमिका छान करु शकते याचा शोध डेव्हिडने घेतला आणि तिला त्याच प्रकारच्या भूमिका करायला लावल्या. गंभीर भूमिकेपेक्षा विनोदी भूमिका करणारी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत तीचे नाव आहे. मालिकेतही तीने आपला हा प्रभाव दाखवलेला आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटातील दादीची व्यक्तीरेखा कमालीची गाजली होती. हीच व्यक्तीरेखा थोड्या वेगळ्या पद्धतीने हिमानीने करावी असा आग्रह बेनाफेर कोहली यांनी धरला. ऍण्ड टीव्हीवर लवकरच सुरु होणार्या ‘हप्पू की उलटन पलटन’ या नव्या मालिकेत तीची ही विनोदी भूमिका हसते रहो अशी काहीसे सांगणारी असणार आहे.

‘हप्पू की उलटन पलटन’ या मालिकेत हप्पू ही जी मुख्य व्यक्तीरेखा दाखवली जाणार आहे त्याच्या आईची भूमिका हिमानी करणार आहे. कटोरी अम्मा असे तिच्या नव्या व्यक्तीरेखेचे नाव असणार आहे. ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेत योगेश त्रिपाठी याने ढेरपोट्या भ्रष्ट अधिकारी साकार केला होता. ही भूमिका प्रेक्षकात लोकप्रिय झाली होती. मालिकेतला हप्पू असाच काहीसा दिसणार आहे. संपूर्ण कॉलनीत वाघोबासारखा वागणारा हा हप्पू घरात मात्र मांजरासारखा वागतो. टोमणे मारणारी बायको, हट्टी आई आणि नऊ मुलं म्हणजे एकप्रकारचा गोंधळच विनोदी पद्धतीने मांडला जाणार आहे. हिमानी या कथेवर प्रचंड खूश आहे. आता ती आपल्याला खूश करते की नाही हे मालिका प्रसारित झाल्यावर कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -