घरमहाराष्ट्रनाशिकनामको नर्सिंग कॉलेजच्या क्रीडा सप्ताहातील स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

नामको नर्सिंग कॉलेजच्या क्रीडा सप्ताहातील स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद

Subscribe

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आयोजित क्रीडा सप्ताहाचा शनिवारी (९ फेब्रुवारी) दिमाखात शुभारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रिले आणि रनिंग स्पर्धा उत्साहात झाल्या.

नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित नामको कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये आयोजित क्रीडा सप्ताहाचा शनिवारी (९ फेब्रुवारी) दिमाखात शुभारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रिले आणि रनिंग स्पर्धा उत्साहात झाल्या.

पेठरोडवरील नर्सिंग कॉलेजच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी व सेक्रेटरी शशिकांत पारख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष आनंद बागमार यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन झाले. या वेळी सेंटर हेड डॉ. महेश पडवळ, प्रशासकीय अधिकारी एम. पी. सिंग, प्राचार्य महेश घोलप आदींच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धांना प्रारंभ झाला. सप्ताहाच्या शुभारंभानंतर लगेचच धावण्याच्या स्पर्धा झाल्या. त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.

- Advertisement -

क्रीडा सप्ताहात कलेलाही प्राधान्य

या क्रीडा सप्ताहांतर्गत सोमवारी रंगोली आणि व्हॉलिबॉल स्पर्धा होतील. तर, १२ फेब्रुवारीला कबड्डी, १3 फेब्रुवारीला प्रश्नमंजूषा आणि वादविवाद स्पर्धा रंगणार आहे. १४ तारखेला ‘मिसमॅच’ आणि ‘ट्विन्स डे’ साजरा होईल. १५ तारखेला नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत होईल. शपथविधी सोहळ्याने १६ फेब्रुवारीला या सप्ताहाची सांगतो होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -