घरमुंबईराफेलवरील कॅग अहवाल राष्ट्रपतींकडे

राफेलवरील कॅग अहवाल राष्ट्रपतींकडे

Subscribe

लढाऊ विमाने राफेलच्या करारातील कथित घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोप काँग्रेसकडून होत असताना नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग)ने आपला अहवाल राष्ट्रपतींकडे सोपवला आहे. काँग्रेसने या राफेल करारावरून राळ उडवली आहे. त्यामुळे कॅगच्या अहवालात नेमके काय आहे, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. हा अहवाल मंगळवारी केंद्र सरकार संसदेत सादर करणार आहे. सोमवारी कॅगने राफेल करारावरील आपला अहवाल राष्ट्रपती भवनात पाठवला आहे.

कॅग आपल्या अहवालाची एक प्रत राष्ट्रपतींकडे तर दुसरी प्रत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठवते. कॅगने राफेल करारावर १२ प्रकरणांचा विस्तृत अहवाल तयार केला आहे. काही आठवड्यांपूर्वी संरक्षण मंत्रालयाने राफेल करारावरील आपली विस्तृत बाजू आणि संबंधित कागदपत्रे कॅगला सोपवली होती. त्यात खरेदी प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि ३५ राफेल विमानांच्या किमतीही सांगण्यात आल्या आहेत

- Advertisement -

कॅगचा हा अहवाल खूपच मोठा आहे. प्रोटोकॉलनुसार तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. आता राष्ट्रपती भवनातून तो लोकसभा अध्यक्षांचे कार्यालय आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार उद्या, मंगळवारी हा अहवाल संसदेत मांडणार आहे. विद्यमान १६ व्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन बुधवारी संपणार आहे. एप्रिल-मेमध्ये देशात १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -