घरमुंबईअचारसंहितेपूर्वीच म्हाडा काढणार लॉटरी

अचारसंहितेपूर्वीच म्हाडा काढणार लॉटरी

Subscribe

सामान्य माणसाच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी म्हाडा आपली पुढची लॉटरी अचारसंहितेपूर्वीच काढणार आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये मुंबई विभागातील घरांचाही समावेश आहे.

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहत असून सरकारी योजनांचा लाभ लोकांना निवडणुकीपूर्वीच मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर सामान्या माणसांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणजेच म्हाडाने आपली पुढची लॉटरी घोषीत केली आहे. अचारसंहितेपूर्वीच ही लॉटरी काढणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या लॉटरीमध्ये मुंबई, पुणे, नाशिकचा समावेश असेल. येत्या काही दिवसांमध्ये म्हाडा लॉटरीच्या घरांची आणि लॉटरीची तारीख जाहीर करणार आहे. औरंगाबाद येथील घरांची लॉटरी अचारसंहिते नंतर घोषीत करणार आहे. त्यामुळे आता लोकांच्या घराची स्वप्न लवकरच पुर्ण होणार आहे.

अशी आहे घरांची संख्या

राज्य सरकारच्या अचारसंहिता लागू होण्याआधी म्हाडाची लॉटरी काढणार आहे. यामध्ये मुंबईतील २३८ घरं आणि १०७ गाळ्यांचा समावेश आहे. पुण्यातील ४ हजार ४६४, नशिक मधील १ हजार, कोकण विभागात ९ हजार घरे आणि औरंगाबाद येथील ८०० घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. अंचारसहितेपूर्वी म्हाडा घरांची लॉटरी काढणार असल्याच्या माहितीला म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दुजोरा दिला आहे. ही घरे डोंबिवली, अंतरर्ली परिसरातील असतील. मुंबईतील घरांच्या किमती या लॉटरीमध्ये कमी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -