घरदेश-विदेश'भारतातील संडास पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येणार'; नेटकऱ्यांनी केले मोदींना ट्रोल

‘भारतातील संडास पाहण्यासाठी परदेशी पर्यटक येणार’; नेटकऱ्यांनी केले मोदींना ट्रोल

Subscribe

'एकेदिवशी देशातील शौचालयं पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येतील', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर नेटकऱ्यांनी मोदींना प्रचंड ट्रोल केले आहे.

देशासाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे. आपलं शहर, गाव स्वच्छ राहिलं तर त्याचा फायदा आपल्यालाच होणार असतो. त्यामुळे स्वच्छता राखणं हे प्रत्येक भारतीयांच कर्तव्य आहे. असेच काहीसे उपदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हरयाणा येथे झालेल्या सभेमध्ये दिले. यावेळी मोदी साहेबांनी उघड्यावर शौचाला जावू नका, असे आवाहन केलं. तसेच एकेदिवशी भारतातील शौचालय पाहायला परदेशी पर्यटक येतील, असे ते म्हणाले. परंतु त्यांचे हेच आव्हान सध्या मोदींच्या अंगलट येताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी नरेंद्र मोदींवर ट्रोलचा प्रचंड मारा केला आहे. खिल्ली उडवणाऱ्या या नेटकऱ्यांना नरेंद्र मोदींनी अगदी संधीही तशीच दिली आहे. ‘एकेदिवशी देशातील शौचालयं पाहण्यासाठी परदेशातून पर्यटक येतील’, असे मोदी म्हणाले. त्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडताना दिसत आहे.

अजब-गजब शौचालयांचे फोटो व्हायरल

सध्या नेटकरी सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्यावरुन वेगवेगळे फोटो टाकत आहे. परदेशातील पर्यटक मोदी सरकारने बनवलेले हेच शौचालय पाहण्यासाठी येतील, असे नेटकरी म्हणत आहेत. हे फोटो फोटोशॉप आहेत की खरेखुरे? हा संशोधनाचा भाग आहे. परंतु या फोटोंवरुन नरेंद्र मोदी प्रचंड ट्रोल होत आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

‘युरोपात एक ठिकाण आहे. त्या भागातील घरांच्या भिंती अतिशय सुंदर आहेत. त्यांच्यावरील रंगरंगोटी पाहण्यासाठी परदेशी पर्यटक गर्दी करतात. एक दिवस असाही येईल, जेव्हा हिंदुस्तानाच्या गावातील शौचालयं पाहण्यासाठी पर्यटक येतील’, असे नरेंद्र मोदी म्हणाले. त्याचबरोबर ‘आपलं सरकार आल्यापासून आम्ही स्वच्छता मोहीम सुरु केली. या स्वच्छता मोहीमअंतर्गत गावागात शौचालय बांधले जात आहे. मी लाल किल्यावरुन स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली तर माझी खिल्ली उडवली. त्यावेळी माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांना महिलांची प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत नाही’, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -