घरमनोरंजनपु. ल. झाले आता तेंडुलकर

पु. ल. झाले आता तेंडुलकर

Subscribe

व्यावसायिक आणि कलात्मक असे चित्रपटाचे दोन गट होते. ते आता संपुष्टात आलेले आहेत. नाटकाच्या बाबतीतही तसेच होते. व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन प्रकारात नाटके सादर केली जात होती. प्रायोगिक नाटकाचा प्रेक्षकवर्ग हा थोडासा वेगळा. चिंतन, प्रबोधन, उच्च दर्जाचे ज्यात काही घडते तिथे या प्रेक्षकांना जायला आवडते. त्यासाठी स्वतंत्र रंगमंचही असायचा. आता स्पर्धेच्या निमित्ताने प्रायोगिक हा शब्द ऐकायला मिळत असला तरी त्याचे प्रयोग मात्र व्यावसायिक रंगमंचावरच होतात. पु. ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकरांनी व्यावसायिक नाटकांबरोबर प्रायोगिक नाटकेही लिहिलेली आहेत. प्रायोगिक नाटक करू पाहणार्‍या अनेक संस्थांना त्यांचे लिखाण हे प्रेरणा देणारे ठरलेले आहे.

पु. ल. झाले आता तेंडुलकर म्हणण्याचे कारण म्हणजे अनंत अंकुश या दिग्दर्शकाने अशाच सर्जनशील लेखकांची नाटके रंगमंचावर आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. पु. लं. च्या जन्मशताब्दीचे निमित्त घेऊन ‘सदु आणि दादु’ या नाटकाचे काही प्रयोग त्याने केले होते. आता विजय तेंडुलकर यांच्या कथेवर आधारित ‘आमच्यावर कोण प्रेम करणार’ हे नाटक करण्याचे ठरवलेले आहे. प्रवीण धोपट हा या नाटकाचा लेखक असून, अनंत अंकुश हा या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर या नाटकाची घोषणा होत आहे हे विशेष म्हणावे लागेल. माई, स्मीतहरी आणि संकल्प थिएटरने यात पुढाकार घेतलेला आहे. स्मीता पाटणकर, योगेश लोहकरे हे या नाटकाचे निर्माते आहेत. प्रयोग अधिक होण्याच्यादृष्टीने अनिल कदम, राजू मोरे सहकार्य करrत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -