घरमनोरंजनकोण आहे पारंगत

कोण आहे पारंगत

Subscribe

‘अस्तित्त्व’ ही अशी संस्था आहे जी स्पर्धा घेतली आणि थांबली असे नाही. ‘कल्पना एक अविष्कार अनेक’ ही सध्या गाजत असलेली स्पर्धा ही या संस्थेची आहे. ‘पारंगत एकांकिका पुरस्कार’ हा अभिनव उपक्रम या संस्थेच्यावतीने राबविला जातो. सर्वोत्कृष्ट एकांकिका, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांची संभाव्य यादी जाहीर करून नंतर त्यांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. यानिमित्ताने मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील एकांकिकांमध्येच चुरस दिसत नाही तर सहभागी कलाकारांमध्येसुद्धा ही चुरस दिसून येते. ‘पारंगत कोण? हा शोध या उपक्रमाच्या माध्यमातून घेतला जातो.

यंदा नामांकनामध्ये ‘देव हरवला’, ‘रेन्बोवाला’, ‘जे फॉर यू म्युझिकल’, ‘आय एम अ‍ॅग्री’, ‘बीफोर द लाईन’, ‘तुरटी’, ‘पैठणी’, ‘लाली’, ‘मादी’, ‘पीसीओ’ या एकांकिकांचा समावेश आहे. अन्य संस्थांच्यावतीने एकांकिका स्पर्धा घेतल्या जातात, त्यात यापैकी बर्‍याचशा एकांकिकांनी पारितोषिकं मिळवलेली आहेत. परंतु ‘पारंगत’मध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता स्पर्धकांमध्ये असते. २४ फेब्रुवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ८ वाजता हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. ‘अस्तित्त्व’चे संचालक रवी मिश्रा यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -