घरमुंबईकाँग्रेस नेत्याचा धक्कादायक खुलासा; 'दलित असल्यामुळे मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले'

काँग्रेस नेत्याचा धक्कादायक खुलासा; ‘दलित असल्यामुळे मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले’

Subscribe

सरकारमध्ये दलितांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर म्हणाले आहेत.

‘दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखले’, असा धक्कादायक खुलासा काँग्रेस नेते आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केला आहे. दावणगेरे येथे रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जी परमेश्वर देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसमधील नेत्यांवर आरोप केले आहेत. परमेश्वर आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमी चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी केलेल्या धक्कादायक खुलासामुळे ते चर्चेत आले आहे.

हेही वाचा – 2-३ दिवसांत कर्नाटकात कमळ फुलणार

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले जी परमेश्वर?

जी परमेश्वर म्हणाले की, ‘बसवलिंगअप्पा मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. के.एच. रंगनाथ यांच्यासोबतही असेच झाले. आमचे मोठे बंधू मल्लिकार्जुग खर्गे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाहीत. मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिलो. मात्र, संघर्षानंतर माझ्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली गेली. दलित नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली नाही. सरकारमध्ये दलितांसोबत भेदभाव होत आहे.’ त्याचबरोबर जी परमेश्वर यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारवर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, राज्यात आरक्षण आहे. परंतु, बढतीबाबत आजही भेदभाव केला जातो.


हेही वाचा –…म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री ढसाढसा रडले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -