घरमुंबईमुंबई सुरक्षित तरीही नागरिकांनी सतर्क रहावे

मुंबई सुरक्षित तरीही नागरिकांनी सतर्क रहावे

Subscribe

मुंबई सुरक्षित असून नेहमी सुरक्षित राहणार आहे, त्यामुळे मुंबईतील नागरिकांनी काळजी करू नये, मुंबई पोलीस नेहमी तुमच्यासोबत असून मुंबईतील नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे, असे मुंबई पोलीस आयुक्तपदाचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवविर्वाचित पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले. त्याचबरोबर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना मदत करावी, असे आवाहनही बर्वे यांनी केले आहे.

राज्य लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे प्रमुख संजय बर्वे यांची अखेर मुंबई पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्याकडून मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार संजय बर्वे यांनी स्वीकारला. नवनिर्वाचित मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यकाळ ६ महिने असून येत्या ऑगस्ट महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. यापूर्वी त्यांना डावलून मुंबई पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांना बसवण्यात आले होते. त्यावेळी बर्वे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

- Advertisement -

मुंबई पोलीस आयुक्तपदाचा नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवविर्वाचित पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पत्रकारांची भेट घेतली. या दरम्यान ते मुंबईच्या सुरक्षेवर बोलताना म्हणाले की, मुंबई सुरक्षित आहे, ती नेहमी सुरक्षित राहील. मुंबईतील नागरिकांनी काळजी करू नये, मुंबई पोलीस तुमच्यासोबत आहेत. नागरिकांनीदेखील नेहमी सतर्क राहून मुंबई पोलिसांना मदत करावी, असे आवाहन बर्वे यांनी केले.

मुंबईतील गुन्हेगारी,सायबर गुन्हे आणि आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी आणि शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आजवर कसोटीला उतरले असून यापुढेही उतरतील. तसेच महाराष्ट्र पोलीस, एटीएस आणि मुंबई पोलीस हे वेगळे नसून एकच यंत्रणा आहे. विभाग मात्र वेगवेगळे आहेत, असे बर्वे म्हणाले. पुलवामा हल्ल्यानंतर सध्याची परिस्थिती लक्षात घेता रस्त्यावरील बंदोबस्ताकडे विशेष लक्ष असणार आहे. रेल्वे पोलीस, हवाई सुरक्षा दल तसेच अन्य तपास यंत्रणाच्या मदतीने सुरक्षेची काळजी घेत आहोत. दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत आहेत. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान आहे. त्यासाठी अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न असेल, असेही बर्वे यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisement -

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल
राज्याचे मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर हे गुरुवारी पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल याची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार गुरुवारी सायंकाळी दुपारी नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे सुपूर्द केला.

१९८५ बॅचचे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असणारे सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी दुपारी राज्य पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला.

प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यास महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे, सध्याची परिस्थिती, निवडणुका या पार्श्वभूमीवर आम्ही सतर्क असल्याचे जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -