घरमनोरंजनग. दि. मां चे गीत वैभव

ग. दि. मां चे गीत वैभव

Subscribe

संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करायचे म्हणजे सध्या वर्षभरतरी पु. ल. देशपांडे. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके या ज्येष्ठ दिवंगतांना टाळता येणार नाही, कारण त्यांची जन्मशताब्दी सुरू आहे. प्रत्येक आयोजकाने कार्यक्रम श्रवणीय आणि दर्जेदार होण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयत्न केलेले आहेत. यातूनही वेगळे काय देता येईल असा प्रयत्न आयोजक आपल्या निर्मितीत करत असतात. ए व्हीच्या माध्यमातून ज्येष्ठांचे विचार, त्यांचे साहित्यातले, कलाप्रांतातले वेगळेपण रसिकांपर्यंत पोहोचलेले आहे, पण क्षणभर कल्पना करा हेच व्यक्ती जर प्रत्यक्ष रंगमंचावर संवाद साधायला आले तर त्यांची उत्तरे काय असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्रिमूर्ती या कार्यक्रमातून केला जाणार आहे. पु. ल. ग. दि. मा. आणि बाबुजी म्हणजेच त्रिमूर्ती असे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे 15 मार्चला दिग्गजांचे रूप धारण करून आलेल्या व्यक्तींशी बातचीत करणार आहेत द्वारकानाथ संझगिरी. स्वरा संस्थेच्यावतीने याचे सादरीकरण केले जाणार आहे. सुप्रिया संझगिरी यांची ही निर्मिती आहे.

वैभव मांगले म्हणजे तो फक्त कलाकार नव्हे तर उत्तम नकलाकारही आहे. जिथे स्टॅन्डअप कॉमेडीचा संबंध येतो, तिथे प्रेक्षकांनीच त्याला अनेक वेळा लता मंगेशकरांच्या आवाजात संवाद आणि गाणी गायला भाग पाडलेले आहे. अलबत्या गलबत्या या नाटकाच्या निमित्ताने त्याची नखरेल चेटकीणही बाल प्रेक्षकांना अधिक भावलेली आहे. त्रिमूर्ती या कार्यक्रमात त्याचा विशेष सहभाग आहे. अविस्मरणीय अशी एक ग. दि. माडगूळकरांची व्यक्तीरेखा तो इथे साकार करणार आहे. पु. ल. देशपांडेंच्या व्यक्तीरेखेसाठी अतुल परचुरे येणार आहे. रंगमंचावर सुधीर फडके साकारण्यासाठी समीर देव या गायकाला निमंत्रित केलेले आहे. वैभव नेमकं काय करणार आहे हे सध्यातरी गुलदस्त्यात ठेवलेले आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या संकल्पना, संहिता, निवेदनात संगीतमय तेवढाच सुसंवाद साधणारा कार्यक्रम होणार आहे. अजय आजगावकर, माधुरी करमरकर यांचा गायक म्हणून यात सहभाग आहे. अजय-मदन हे या कार्यक्रमाचे संगीत संयोजन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -