घरमनोरंजनस्वप्निल जोशी लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

स्वप्निल जोशी लवकरच दिसणार ‘या’ चित्रपटात

Subscribe

लवकरच श्रावणी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी मुख्य भुमिकेत आहे.

श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘मोगरा फुलला’ १४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित होणार आहे. मोगरा फुललाच्या निमित्ताने श्रावणी देवधर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत आहेत. या आधी त्यांनी लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. आता मोगरा फुललामधून पुन्हा एकदा आपला वेगळा टच देण्यास तयार झाला आहे.

हे कलाकार दिसणार

- Advertisement -

या चित्रपटांमध्ये स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत.

“मोगरा फुलला’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनामध्ये पुनरागमन करत असल्याचा मला अत्यंत आनंद आहे. ही आगळ्या पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते,” असे दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी चित्रपटाविषयी बोलताना म्हणाल्या.

- Advertisement -

“मोगरा फुलला’ची निर्मिती करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. या चित्रपटाची कथा मराठी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. श्रावणी देवधर यांच्याबरोबर काम करत असल्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे, कारण त्या एक अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती अशा दिग्दर्शिका आहेत. त्यांनी सचिन मोटे यांच्याबरोबर चित्रपटाच्या कथेवर गेले वर्षभर खूप काम केले आहे,” असे चित्रपटाचे निर्माचे अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -