घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीचे रणजित मोहिते पाटील उद्या भाजपात जाणार?

राष्ट्रवादीचे रणजित मोहिते पाटील उद्या भाजपात जाणार?

Subscribe

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंग मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. पण आता विजयसिंग मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार नसल्याची सूत्रांद्वारे समोर आले आहे. मात्र, दुसरीकडे विजयसिंह यांचे पुत्र रणजित मोहिते पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगते आहे. रणजित मोहिते पाटील उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, उद्या मंत्रालयासमोरील महिला सभागृहात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होईल. मात्र, भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलेलं नसल्याचंही बोललं जात आहे.

रणजितसिंह मोहिते-पाटलांनी काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती. माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील घराण्याची असलेली ताकद पाहता, भाजपकडून त्यांच्या पक्षप्रवेशाचे प्रयत्न सुरु होते. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. माढामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभारण्यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने मोहिते-पाटील यांच्या नावाची अद्याप घोषणा केलेली नसल्यामुळे विजयसिंग मोहिते पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा उठली होती.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे पाटील यांनी निवडणुकांच्या काळात शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटदेखील घेतली. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे स्वर उमटले आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाचे नुकसान होईल अशा प्रतिक्रियादेखील उमटत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -