घरमहाराष्ट्रअनैतिक संबंधातून मित्राची केली हत्या

अनैतिक संबंधातून मित्राची केली हत्या

Subscribe

मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध करुन मित्राचाच खून केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. या हत्येखोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने २४ तासात आरोपीला पकडले आहे.

मित्राच्या पत्नीसोबत अनैतिक संबंधातून मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. ही घटना भिवंडीच्या दापोडा ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. पारसनाथ कांता साहू (२७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी २४ तासात हत्याखोराला पकडले आहे. या हत्याखोराला पकडण्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा चांगला फायदा   पोलिसांना झाला आहे. दापोडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

दापोडा येथे एका गोदामात चार मित्र मजुरीचे काम करतात करायचे. यातील एका युवकाने त्यांच्यातल्याच मित्राची १९ मार्च रोजी हत्या केली. पारसनाथ कांता साहू (२७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पारसनाथ हा मुळचा मध्यपप्रदेशचा आहे. हल्लेखोराने लाकडी दांडक्याने पारसनाथवर हल्ला केला होता. त्यामुळे पारसनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडला. पारसनाथला मारुन हल्लेखोराने पळ काढला. पारसनाथच्या इतर मित्रांना या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते ताबोडतोब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पारसनाथला माणकोली येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात गेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी संजयकुमार गणपत साहू याने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अज्ञाताचा शोध घेण्यास सुरवात केली. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने हल्लेखोराला पकडले. या आरोपीचे नाव रामधनी  उर्फ पंचम छगूर गुप्ता (२५) असे आहे. तो पळून जाण्याच्या बेतात असताना पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे स्थानक येथून अटक केली.

हल्लेखोराने सांगितले कारण

पोलिसांनी रामधनीची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, आरोपी रामधनी  उर्फ पंचम छगूर गुप्ता आणि हत्या झालेला पारसनाथ हे दोघे मजुरी काम करीत असल्याने मित्र होते. पूर्वी पारसनाथ हा आपल्या पत्नीसह दापोडा येथे राहत असल्याने तेथे रामधनी येत असल्याने त्याची पारसनाथ याच्या पत्नी सोंबत ओळख होऊन त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. याची कुणकुण पारसनाथ याला लागल्याने जानेवारी महिन्यात त्याने आपल्या पत्नीला गावी मध्यप्रदेश येथे पाठवून दिले. त्याबाबत एकदा भांडण झाले असता मोबाईलवरून त्याने रामधनी यास शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरुन ही हत्या केल्याचे त्याने कबुल केले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -