घरदेश-विदेशप्रसाधनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची विकृताने केली शूटिंग

प्रसाधनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची विकृताने केली शूटिंग

Subscribe

प्रसाधनाला गेलेल्या अल्पवयीन मुलीची शुटिंग केल्यामुळे एका विकृताला अटक केले आहे. हा विकृत मानसिक रोगी असल्याचे सांगितले जात आहे.

एका पुस्तकाच्या दुकानामध्ये प्रसाधनासाठी गेलेल्या मुलीचे चित्रीकरण करण्याचा प्रकार समोर आला आहे. एका विकृताने आपल्या मोबाईल फोनवरून या मुलीचे चित्रीकरण केले. या मुलीला याची कल्पना आल्यानंतर तिने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली होती. या ठिकाणी लोक जमा झाली असता त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र नंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. रुशी बलवंत असे या विकृताचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर पीडित मुलीला मानसिक धक्का बसला आहे.

कसा घडला प्रकार

आरोपी रुशी बलवंत हा या पुस्तकाच्या दुकानात दर शनिवार रविवार येतो. या दुकानातच पीडित मुलगी पुस्तक घेण्यासाठी आली होती. त्यावेळी ही मुलगी प्रसाधन गृहात गेली होती. तिच्या मागे हा विकृतही त्याच दिशेने गेला होता. प्रसाधन गृहाच्या दरवाज्याच्या फटीतून मोबाईलने हा विकृत शुटिंग करत होता. या मुलीला लक्षात आल्यानंतर तिने आरडा ओरड केला. त्यावेळी घाबरून त्याने घटनास्थळावरून पळ काढला. मुलीच्या तक्ररीवरून पोलिसांनी त्याला अटक केले. दरम्यान त्याने मोबाईलमधली शुटिंग डिलीट केली होती. पोलिसांनी या आरोपी विरोधात पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -