घरक्रीडावय चोरी करणार्‍या बॅडमिंटनपटूंवर बंदी घाला !

वय चोरी करणार्‍या बॅडमिंटनपटूंवर बंदी घाला !

Subscribe

भारतीय बॅडमिंटनचे प्रमुख प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यामते भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने वय चोरी करणार्‍या बॅडमिंटनपटूंवर बंदी घातली पाहिजे, जेणेकरून वय चोरीचे प्रकार भविष्यात घडणार नाहीत. वय चोरी हा प्रकार भारतीय खेळांमध्ये बर्‍याच वेळा होताना दिसतो. याला आळा घालण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि भारतीय टेबल टेनिस फेडरेशन यांनी वय चोरी करणार्‍या खेळाडूंवर बंदीची कारवाई केली आहे. आता तशीच कारवाई बॅडमिंटनमध्ये करण्याची वेळ आली आहे असे गोपीचंद यांचे मत आहे.

माझ्या मते तुम्ही अयोग्य गोष्टी करणार्‍यांबाबत काही तरी कठोर निर्णय घेतले पाहिजेत. वय चोरी हा चुकीचा प्रकार आपल्याकडे खूप पहायला मिळतो. वय चोरी हा प्रकार थांबवायचा असल्यास अशा खेळाडूंवर बंदी घालणे आवश्यक आहे, जेणेकरून एक उदाहरण निर्माण होईल, असे गोपीचंद म्हणाला.

- Advertisement -

२०१६ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने चार ज्युनियर खेळाडूंनी जन्म दाखल्याबरोबर छेडछाड केल्याचा अहवाल भारतीय बॅडमिंटन असोसिएशनकडे सुपूर्द केला होता. तसेच बॅडमिंनटमध्ये वय चोरीचे प्रकार थांबाविण्यासाठी भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने योग्य ती पावले उचलावीत यासाठी मागील वर्षी डिसेंबरमध्ये होतकरू बॅडमिंटनपटूंच्या ३७ कुटुंबियांच्या गटाने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -