घरमहाराष्ट्रनाशिकमधमाशांच्या हल्ल्यात १० भाविक जखमी, २ गंभीर

मधमाशांच्या हल्ल्यात १० भाविक जखमी, २ गंभीर

Subscribe

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मार्कंडेय पर्वतावर दर्शनासाठी निघालेल्या १० भाविकांवर शुक्रवारी, ५ एप्रिलला सकाळी हल्ला केला.

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील मार्कंडेय पर्वतावर दर्शनासाठी निघालेल्या १० भाविकांवर शुक्रवारी, ५ एप्रिलला सकाळी हल्ला केला. विशेष म्हणजे त्यांच्यावर उपचारासाठी निघालेल्या डॉक्टरांच्या पथकालाही मधमाशांच्या आक्रमकतेमुळे परत फिरावे लागले. स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत जखमींना सुरक्षित स्थळी हलविल्यानंतर उपचार सुरू झाले.

श्री सप्तशृंगी गडासमोरील मार्कंडेय ऋषींच्या पर्वतावर दर अमावास्येला दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. शुक्रवारी येवला तालुक्यातील नगरसूल येथील दिंडी दर्शनासाठी मार्कंडेय पर्वतावर निघाली होती. त्यात १०० भाविकांचा सहभाग होता. दिंडी मंदिरापासून काही अंतरावर हे भाविक एका झाडाखाली बसले. याच वेळी अज्ञात व्यक्तीने धूर केल्याने येथील आग्या मोहोळातील मधमाशांनी दिंडीतील भाविकांवर हल्ला केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मधमाशांच्या चाव्यापासून वाचण्यासाठी भाविकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. तोपर्यंत १० भाविक जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, त्यांनाही मधमाशांनी परतावून लावले. अखेर, मुळाने येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना सुरक्षित ठिकाणी आणले त्यानंतर आरोग्य पथकाने उपचार सुरू केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -