घरमनोरंजनसुव्रत-सखी अडकले लग्नबंधनात

सुव्रत-सखी अडकले लग्नबंधनात

Subscribe

दिल दोस्ती दुनीयादारी या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले आज विवाहबंधनात अडकले आहेत. या सोहळ्यातील काही फोटो त्यांच्या सेलेब्रेटी मित्रांनी सोशलमिडीयावर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार सुरू होती. मात्र त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यामुळे ही चर्चा थांबली आहे.

 गेले दोन दिवस सुव्रत केळवणाचे फोटो इन्स्टावर शेअर करत होता. सुव्रत-सखीची मेहंदी सोहळाही बुधवारी पार पडला. या विवाह सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली आहे. या दोघांचा मेहंदी सोहळा आणि सेलेब्रेशन पार्टीचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

सुव्रत आणि सखी गोखले यांनी दुनियादारी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर त्या दोघांचे सोशल मीडियावरील एकत्र फोटो किंवा कोणताही इव्हेंट किंवा कॉफी वा सिनेमाला एकत्र जाण्याचे फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांनी याबाबत स्वतः कधीच खुलासा केला नाही. या मालिकेनंतर अमर फोटो स्टुडिओ या नाटकात हे दोघं एकत्र दिसले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -