घरदेश-विदेशसरकारच्या या निर्णयाला भाजप उमेदवाराचा विरोध; मोदींसमोर करणार आत्महत्या?

सरकारच्या या निर्णयाला भाजप उमेदवाराचा विरोध; मोदींसमोर करणार आत्महत्या?

Subscribe

घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोरच आत्माहत्या करेन असा इशारा बीजेपी उमेदवाराने दिला आहे.

घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करणार असल्याचं आश्वासन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिलं आहे. याच आश्वासनावर भाजप निवडणूक लढवत आहे. मात्र या विधेयकाला भाजपाच्याच एका उमेदवारानं विरोध केला आहे. विधेयक लागू केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं समोरच आत्माहत्या करेन असा इशारा दिला आहे.

घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी नागरिकत्व (सुधारणा) विधेयक लागू करण्याचे आश्वासन भाजपाने दिलं. पण मेघालयातील शिलाँग लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सनबोर शुल्लाई यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या विरोधकाला विरोध करणार आहे. गरज पडली तर नरेंद्र मोदींच्या समोरच आत्महत्या करेन. या विधेयकाला शेवटपर्यंत तयारी त्यांनी दर्शवली.

- Advertisement -

गुरूवारी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घुसखोरांना बाहेर काढण्याचं आश्वासनं दिलं. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे घुसखोरांचा ‘व्होटबँके’साठी वापर करणार नाही.असही ते अश्वासन देताना म्हणाले होते. राष्ट्रीय सुरक्षेला आमचं प्राधान्य आहे असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -