घरमुंबईदीड वर्षांपूर्वीच्या हत्येचा गुन्हा उलगडला

दीड वर्षांपूर्वीच्या हत्येचा गुन्हा उलगडला

Subscribe

एकूण चार हत्या केल्याचे उघड

दीड वर्षांपूर्वी माहीम येथे झालेल्या एका बेवारस तरुणाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीस शुक्रवारी माहीम पोलिसांनी अटक केली. विठ्ठल शिवलिंगप्पा भजंत्री असे या 27 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध हत्येच्या चार गुन्ह्यांची नोंद आहे. त्यापैकी मुंबईत तीन तर कर्नाटक येथे एक हत्येचा समावेश असून चारही हत्येनंतर त्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. लंगडा आणि छक्का म्हणून हिणवल्याने त्याने दीड वर्षांपूर्वी जंबुरा या 40 वर्षांच्या व्यक्तीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

13 ऑक्टोंबर 2017 रोजी माहीम येथील वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणार्‍या समुद्रकिनार्‍याजवळील झुडपात एका 40 वर्षांच्या इसमाचा मृतदेह माहीम पोलिसांना सापडला होता. या इसमाची ओळख पटली नव्हती. त्याची अज्ञात मारेकर्‍याने डोक्यात पेव्हर ब्लॉकने मारहाण करुन हत्या केली होती. याप्रकरणी माहीम पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून अज्ञात मारेकर्‍याचा शोध सुरु केला होता. याच गुन्ह्यांत यावर्षी जानेवारी महिन्यांत विठ्ठल भजंत्री याला वांद्रे पोलिसांनी एका हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली होती. पोलीस तपासात त्याने 4 जानेवारी वांद्रे येथे सुरज ऊर्फ कालू या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. हत्येचा पुरावा नष्ट करुन तो पळून गेला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या विठ्ठलला 21 जानेवारीला कर्नाटक येथून पोलिसांनी अटक केली. या हत्येची कबुली देताना त्याने कर्नाटक येथे देवेंद्र पंडित या 43 वर्षांच्या व्यक्तीची अशाच प्रकारे हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केला होता. या हत्येनंतर तो मुंबईत पळून आला होता.

- Advertisement -

मुंबईत आल्यानंतर त्याने सुरज ऊर्फ कालूची हत्या केली होती. या हत्येपूर्वी त्याने माहीम कॉजवे, एस.व्ही रोडवरील मुदुंगाचा मैदानात बंगाली आणि वांद्रे-वरळी सी लिंककडे जाणार्‍या समुद्राकिनार्‍याजवळील झुडपात जुंबरा याची पेव्हर ब्लॉक डोक्यात घालून हत्या केली होती. त्याच्या अटकेने एक दोन नव्हे तर चार हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले होते, याच हत्येप्रकरणी विठ्ठलला शुक्रवारी माहीम पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. जंबुरा आणि बंगाली हे दोघेही त्याचे जवळचे मित्र होते, मात्र जंबुरा त्याला सतत लंगडा आणि छक्का म्हणून हिणवत होता, त्यातून रागाच्या भरात त्याने त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -