घरमनोरंजनपन्नाशीचा सलमान म्हणतो,'जवानी हमारी जानेमन थी'

पन्नाशीचा सलमान म्हणतो,’जवानी हमारी जानेमन थी’

Subscribe

सलमान खानच्या भारत चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. लवकरच सलमानचा भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भारत’ या चित्रपटाचं दुसरं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान अगदी तरूण दिसत आहे. १५ एप्रिलला चित्रपटचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमधला त्याचा लूक खूप लक्षवेधी ठरला होता. आता नव्याने आलेल्या या पोस्टरमधल्या लूकला तरूणींचा खूप प्रतिसाद मिळत आहे. कारण या नव्या लूकमध्ये सलमान खूपच तरूण आणि हॅण्डसम दिसत आहे.

- Advertisement -

जवानी हमारी जानेमन थी

सलमानने आपला हा यंग लूक ‘जवानी हमारी जानेमन थी’ असं म्हणत सोशसमिडीयावर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये सलमान खूप यंग दिसत आहे. पहिल्या पोस्टरमध्ये सलमानचा उतारवयातला लूक बघायला मिळात आहे. या लूकचीही खूप चर्चा झाली.

- Advertisement -

पहिल्या पोस्टरचीही चर्चा

‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे. वयोवृद्ध लूकमधील हा पोस्टर शेअर करत सलमानने लिहिले, ‘जितने सफेद बाल मेरे सिर और दाढी मै है, उससे कई ज्यादा रंगीन मेरी जिंदगी रहीं है.’ सलमानच्या या पोस्टरने नक्कीच चित्रपटाची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि जॅकी श्रॉफसुद्धा पाहायला मिळत आहेत.

सलमानसोबतच यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -