घरमहाराष्ट्रनिवडणूक खर्चात तफावत; डॉ. सुजय, संग्राम जगताप यांना आयोगाची नोटीस

निवडणूक खर्चात तफावत; डॉ. सुजय, संग्राम जगताप यांना आयोगाची नोटीस

Subscribe

निवडणूक खर्चात तफावत असलेल्या १५ जणांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत पुढच्या ४८ तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. सर्वच पक्ष निवडणूक प्रचारावर चांगलाच खर्च करत आहे. या खर्चाबाबत निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागते. दैनंदिन निवडणूक खर्च सादर करताना तफावत आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहमदनगर मतदारसंघातील १२ उमेदवारांना नोटीस बजावली आहे. या उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्वांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवत पुढच्या ४८ तासांमध्ये खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

७० लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा

नगर मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून, या मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा ७० लाख रुपयांपर्यंत असून, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून दैनंदिन निवडणूक खर्च उमेदवाराने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नगर मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या १ ते १० एप्रिल या काळात केलेल्या खर्चाची नुकतीच तपासणी करण्यात आली. झेरॉक्सचे बिल न जोडणे, देणगी मिळालेले पैसे बँकेत जमा न करता परस्पर खर्च करणे, नोटरीच्या पावत्या न जोडणे, देणगी देणाऱ्यांच्या नावाची यादी नसणे, देणगी पावत्यांच्या प्रती तपासणीसाठी सादर न करणे, अनामत रक्कम पावती न जोडणे, घोषित केलेला खर्च व निवडणूक आयोगाच्या संगणीत केलेला खर्च यामध्ये तफावत असणे, अशा त्रुटी तपासणीत आढळल्या आहेत. खर्चात त्रुटी आढळलेल्या बारा उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली असून, संबंधित उमेदवाराने त्यांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करताना आढळलेल्या त्रुटींबाबत ४८ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

डॉ. सुजय यांच्या खर्चात ४ लाखांची तफावत

भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी १ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान प्रचारासाठी घोषित केलेल्या खर्चामध्ये खूप तफावत आहे. या दहा दिवसाच्या कालावधीमधअये त्यांनी १४ लाख ५६ हजार ८३० होता. मात्र प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च १८ लाख ५४ हजार ३५७ आहे. याचा अर्थ ३ लाख ९७ हजार ५२७ रूपयांचा खर्च सुजय विखे-पाटील यांना कमी दाखवला आहे.

संग्राम यांच्या खर्चात साडे पंधरा लाखांची तफावत

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी देखील त्यांच्या प्रचासाठी केलेल्या खर्चात तफावत दाखवली आहे. त्यांनी घोषित केलेला खर्च ५ लाख ४२ हजार ५१२ एवढा असून निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च २० लाख ९५ हजार १०६ रूपये आहे. याचा अर्थ १५ लाख ५२ हजार ५५४ रूपयांचा खर्च त्यांनी कमी दाखवला आहे. या दोन्ही उमेदवारांसह निवडणूक आयोगाने १२ उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

संग्राम जगतापांची ‘ही’ खेळी सुजय विखेंना तापदायी ठरणार


नोटीस देण्यात आलेले उमेदवार

खर्चात त्रुटी आढळल्याने डॉ. सुजय विखे (भाजप), संग्राम जगताप (राष्ट्रवादी), अॅड. नामदेव वाकळे (बसपा), सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी), कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना), संजय सावंत (बहुजन मुक्ती पार्टी), साईनाथ घोरपडे (अपक्ष), संदीप सकट (अपक्ष), भास्कर पाटोळे (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष), शेख आबिद महंमद हनीफ (अपक्ष), रामनाथ गोल्हार (अपक्ष) या बारा उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -