घरमनोरंजनमतदानासाठी शाहरूखचं 'रॅप' अपिल !

मतदानासाठी शाहरूखचं ‘रॅप’ अपिल !

Subscribe

शाहरूख खाननेही मतदान जागृतीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे. हा रॅप साँगचा व्हीडीओ त्याने ट्वीटरवर शेअर केला आहे.

सध्या सगळे लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, मतदानासाठी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करतोय. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीयेत. बॉलिवूडचा दबंग खान,मिस्टर परफेक्टनिस्ट अमिर खान यांनी सगळ्यांना मतदानाचं आवाहन केल्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खाननेही मतदान जागृतीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे.

- Advertisement -

शाहरूखचं भन्नाट रॅप साँग

शाहरूखने संपूर्ण जनतेला एका भन्नाट रॅप साँगमधून मतदान करा असं अवाहन केलं आहे. ‘इट्स टाईम टो व्होट’ असं म्हणत शाहरूखने मतदानाचं अवाहन केलं आहे. हसत,खेळत धम्माल व्हीडीओमधून मतदानाचं महत्त्व त्याने सांगितलं आहे. मतदान आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे शाहरूखने या व्हीडीओत सुंदर मांडलं आहे.

हा व्हीडीओ ट्वीटरवर शेअर करताना शाहरूखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. शाहरूख म्हणतो, मोदी साहेब तुम्ही क्रिएटीव्हपणे मतदानाचं आवाहन करा असं म्हणाला होता. मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही मतदानकरायला उशीर करू नका. मतदान हा तुमचा केवळ हक्क नाही तर खरी ताकद आहे. धन्यवाद.

- Advertisement -

मोदींच सेलेब्रेटींना अवाहन

निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत बॉलिवूड सेलेब्रेटींना, मतदारांना  मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करा. असे अवाहन केले होते. मोदींच्या अवाहनानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे अवाहन केले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -