घरदेश-विदेशजगभर योग दिनाचा उत्साह

जगभर योग दिनाचा उत्साह

Subscribe

देशासह जगभरात चौथ्या आंतरराष्ट्रीय दिनाचा उत्साह पाहायाला मिळत आहे. डेहराडून,दिल्ली, कोटा आणि मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा केला जात आहे. डेहराडून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीने आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह योगा केला. तर, कोटामध्ये रामदेव बाबा यांनी देखील योग दिनानिमित्त आपली हजेरी लावली.

देशासह जगभरात चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह पाहायाला मिळत आहे. देशासह राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांमध्ये देखील योग दिनाचा उत्साह पाहायाला मिळाला. योग दिनानिमित्त देशभरात तब्बल पाच हजारपेक्षा जास्त कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. डेहराडून,दिल्ली, कोटा आणि मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योग दिवस साजरा केला जात आहे. डेहराडून येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह योगा केला. तर, कोटामध्ये रामदेव बाबा यांनी देखील योग दिनानिमित्त आपली हजेरी लावली.

photo us times square
(फोटो सौजन्य : बेस्ट पिक्सेल स्टोरीज्)

मुंबईत विविध ठिकाणी योग दिन

राज्यभरासह मुंबईमध्ये विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला जात आहे. योग दिनानिमित्त वांद्रे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, खासदार पुनम महाजन, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी योगा केला. तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव यांन देखी राजभवन येथे योगासने केली. मुंबई येथील गेट वे येथे कॅबिनेट मंत्री राज पुरोहीत आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी देखील शाळेतील विद्यार्थांसोबत योगा केला.

yoga in bandra
(वांद्रे येथील पोलिसांचा योगा कार्यक्रमात सहभाग)
yoga in gate way
(गेट वे येथे योगा करताना विद्यार्थी)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -