घरक्रीडापनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे पीपीएलचे आयोजन

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे पीपीएलचे आयोजन

Subscribe

पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडेमीमार्फत टी – ट्वेन्टी पनवेल प्रीमियम लीग २०१९ चे आयोजन एएससी महाविद्यालयाच्या प्रांगणात १२ मे ते १९ मे दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांनी दिली.

दिनांक १२ मे ते १९ मे रोजी पनवेलमधील एएससी महाविद्यालयाच्या प्रांगणात खेळविल्या जाणार्‍या पनवेल प्रीमियम लीगसाठी रायगड जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंची निवड केली जाणार आहे. यावेळी एकूण ६ संघांमध्ये हे सामने खेळविले जाणार असून या ६ संघांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. यावेळी बीसीसीआय च्या नियमांनुसार या स्पर्धा भरविल्या जाणार असून येत्या ५ मे रोजी खेळाडूंच्या निवडीसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी करण्यात येणार्‍या बोलीमध्ये अधिकतम बोली ही रुपये ३ हजार पर्यंत असणार आहे, एकूण १४ जणांच्या संघाची बोली ३० हजार रुपयांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

- Advertisement -

क्रिकेटच्या जगतात फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षण आदींमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणार्‍या आपल्या उत्तम खेळाचे दर्शन घडवून आणणार्‍या खेळाडूंना यामध्ये सामावून तर घेतले जाणार आहेच, मात्र त्याहुनही अधिक बीसीसीआयमध्ये पंच म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या पंचांचा या स्पर्धेदरम्यान सहभाग असणार आहे. यामध्ये चंद्रकांत म्हात्रे हे पनवेलमधील बीसीसीआयचे पंच आहेत त्यांचा या सामन्यांमध्ये समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -