घरदेश-विदेशप्रवाशांना हाकलवण्यासाठी पायलटनं केलं अमानवीय कृत्य

प्रवाशांना हाकलवण्यासाठी पायलटनं केलं अमानवीय कृत्य

Subscribe

एअर एशियाच्या पायलटनं केलेलं अमानवीय कृत्य प्रवाशांपैकी एक दिपांकर रे यानं व्हायरलं केलं आहे. 'अव्यावसायिक आणि कठोर' अशा शब्दामध्ये त्यानं तक्रार केली आहे.

एअर एशिया इंडिया या खासगी विमान कंपनीचं फ्लाईट कोलकाता ते बागडोगरा जात होतं. मात्र हे फ्लाईट मुळातच चार तास उशीरा होतं. त्यामुळं प्रवासी आणि फ्लाईटचा कर्मचारीवर्ग, पायलट यांच्यात वाद झाले. यावेळीच पायलटनं केलेलं अमानवीय कृत्य प्रवाशांपैकी एक दिपांकर रे यानं व्हायरलं केलं आहे. ‘अव्यावसायिक आणि कठोर’ अशा शब्दामध्ये त्यानं तक्रार केली आहे.

नक्की काय झालं?

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक दिपांकर रे यांनी सांगितलं, “प्रवाशांना विमानात काहीही खाणं – पिणं न देता दीड तास बसवून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर विमानातून उतरण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. त्यावेळी बाहेर मुसळधार पाऊस असल्यामुळं प्रवाशांनी खाली उतरण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर पायलटनं एसीचा फोर्स वाढवला. त्यामुळं विमानात धुकं झालं आणि लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. इतकंच नाही तर महिलांना उलट्या झाल्या आणि लहान मुलं रडायला लागली होती.”

- Advertisement -

फेसबुकवर केला व्हिडिओ पोस्ट

दिपांकरनं ‘भारतातील विमानकंपन्या अशा तऱ्हेने कार्यरत आहेत. विशेषतः एअर एशिया, एअर एशियामधून प्रवास करणं टाळा’ असं सांगत हा व्हिडिओ आपल्या फेसबुक प्रोफाईलवर पोस्ट केला.

एअर एशियाची दिलगिरी

यासंदर्भात एअर एशियानं दिलगिरी व्यक्त केली. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये तांत्रिक बिघाडामुळं चार तास उशीर झाल्याचं म्हटलं असून माफी मागण्यात आली आहे. मात्र पायलटनं जाणूनबुजून एसी वाढवल्याचा आरोप कंपनीनं फेटाळला आहे. एसी चालू असल्यानं विमानात समस्या निर्माण झाली हे मात्र त्यांनी स्वीकारलं आहे. तसंच प्रवाशांची आम्ही योग्य रितीनं देखभाल केल्याचा दावाही कंपनीनं केला.

- Advertisement -

 

Air Craft is on fire ..Not exactly. Flight no I5 582 of Air Asia to Bagdogra. First they pushed back, then returned to bay .. then anounced technical snag. Kept stationary for one hour on tarmac to instruct deplaning. When passengers objected, put blowers in full blast to hound passengers out. Simply suffocating kids …No food or water in beteeen.This is the way Aviation industry work in India. This #AirAsiaservice was perticularly scary …Avoid Air Aisia …

Posted by Dipankar Ray on Tuesday, 19 June 2018

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -