घरटेक-वेकआता 'लँडलाईन' वरुनही करा SMS चॅटिंग

आता ‘लँडलाईन’ वरुनही करा SMS चॅटिंग

Subscribe

स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीमुळे 'लँडलाईन' फोन कुठेतरी मागे पडलाय. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये लँडलाईनचं महत्व नक्कीच कमी झालंय. मात्र, आता लवकरच तुमच्या स्मार्टफोन सारखाच लँडलाईनही 'स्मार्ट' होणार आहे.

सध्या जमाना आहे स्मार्टफोन्सचा. इतर देशांप्रमाणेच आपल्याकडेही स्मार्टफोन्स वापरणाऱ्या लोकांची खूप जास्त आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत स्मार्टफोन्सचं हे जाळं आपल्याकडे पसरलं. सर्वसान्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतींचे फोन बाजारात आल्यामुळे लोकांमधील स्मार्टफोनची क्रेझ अधिकच वाढली. यामुळे पूर्वी सगळ्यांच्या घरात असणारे लँडलाईन फोन्स हळूहळू कमी होऊ लागले. मात्र, आता हे लँडलाईन फोन्ससुद्धा ‘स्मार्टफोन्स’ बनण्याच्या वाटेवर आहेत.

लँडलाईनचं रुपडं पालटणार

स्मार्टफोन्सच्या वाढत्या मागणीमुळे लँडलाईन फोन्सची मागणी दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्यामुळे आता लँडलाईन फोनलाच स्मार्ट बनवणार असल्याचे संकेत बीएसएनएलने दिले आहेत. नुकताच याबबतचा पहिला प्रयोग बीएसएनएलकडून राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात सुरु करण्यात आला आहे. याअंतर्गत तिथल्या टेलिफोन एक्सचेंजला ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्किंग’ (एनजीएन) परावर्तित केलं जात आहे.

- Advertisement -

कसा मिळेल ‘स्मार्ट’ लँडलाईन फोन?

ज्या युजर्सना हा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज लँडलाईन वापरयचाय त्यांना त्यांचा जुना फोन परत करुन, त्याबदल्यात ‘आयपी फोन’ घ्यावा लागेल. बीएसएनल कंपनीच हे आयपी मॉडेल युजर्सना उपलब्ध करुन देणार असल्याचं समजतंय. याबाबत बीएसएनएल लवकरच अधिकृत घोषणा देखील करणार आहे.

‘स्मार्ट’ लँडलाईनचे फायदे –

सध्याच्या टेलिफोन एक्सचेंजची कार्यप्रणाली ‘नेक्स्ट जनरेशन नेटवर्किंग’मध्ये यशस्विरित्या परावर्तित झाल्यावर, तुम्ही लँडलाईन फोनही एखाद्या स्मार्टफोनप्रमाणे वापरु शकता. या सुविधा होतील उपलब्ध –

  • लँडलाईनद्वारे करता येणार व्हिडीओ कॉलिंग, SMS आणि टेक्स्ट चॅटिंग
  • युजर्स त्यांच्या लँडलाईन नंबरसाठी ठेवू शकणार आवडती रिंगटोन
  • लँडलाईनवर आलेला कॉल तुमच्या मोबाईलवर होऊ शकतो ऑटो ट्रान्सफर
  • जेणेकरुन तुम्ही घरी नसातानाही लँडलाईनचे फोन उचलू शकता तुमच्या मोबाईलवर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -