घरमहाराष्ट्रपॅरा सेलिंग बेतले जिवावर; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; वडील जखमी

पॅरा सेलिंग बेतले जिवावर; १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू; वडील जखमी

Subscribe

मुरुड समुद्रकिनारी पॅरा सेलिंग करताना एका १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रकिनारी पॅरा सेलिंग करण्याची अनेकांना हौस असते. मात्र, ही हौस एका १५ वर्षाच्या मुलाच्या जीवावर बेतली आहे. पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने एका १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मुरुड समुद्रकिनारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. वेदांत गणेश पवार (१५) असे या मुलाचे नाव असून या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील कसबा रोड येथे राहणारे गणेश पवार हे कुटुंबासह अलिबाग येथे फिरण्यास आले होते. हे कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करत सुट्टीचा आनंद लुटत होते. त्यादरम्यान मुलांनी आणि वडीलांनी पॅरा सेलिंग करण्याचे ठरवले. वडील गणेश पवार यांनी मुलगा वेदांतला घेऊन पॅरा सेलिंगसाठी गेले. पॅराशूट उंच झेपावल्यानंतर काही वेळातच दोर तुटले आणि दोघेही वरुन खाली कोसळले. या दुर्घटनेत वेदांतचा जागीच मृत्यू झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत. वडीलांना मुरुड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुलाचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -