घरट्रेंडिंग'संसद आहे, तुमच्या चित्रपटाचा सेट नाही'; चाहत्यांनी सुनावले

‘संसद आहे, तुमच्या चित्रपटाचा सेट नाही’; चाहत्यांनी सुनावले

Subscribe

संसदेच्या आवारात फोटो काढणं दोन बंगाली अभिनेत्रींना प्रचंड महागत पडलं आहे. या अभिनेत्रींना चाहत्यांनी 'हे संसद आहे, तुमच्या चित्रपटाचा सेट नाही' अशा शब्दांत खडेबोल सुनावले आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीत जिंकून आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या बंगाली अभिनेत्री मिमि चक्रवर्ती आणि नुरसत जहॉं यांना सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रचंड ट्रोलचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच त्या संसदेत गेल्या होत्या. संसदेत जाण्याचा त्यांचा तो आयुष्यातील पहिला दिवस होता. त्यामुळे त्यांनी हा आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. यासोबतच त्यांनी आपले संसदेतील फोटो सोशल मीडियावर टाकले. या फोटोंवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय ‘हे संसद आहे, तुमच्या चित्रपटाचा सेट नाही’, असे चाहत्यांनी खडेबोल सुनावले.

नेमकं काय आहे पोस्टमध्ये?

नुसरत जहाँने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर केला. फोटोसोबत नुसरतने लिहले की, ‘एक नवीन सुरुवात. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल ममता बॅनर्जी आणि बशीरहाट लोकसभा क्षेत्रातील नागरिकांची आभारी आहे.’ तर मिमिने फोटोसोबत ‘संसदेतील पहिला दिवस’ असे कॅफ्शन दिले आहे. दोघींच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल केले. ट्रोल करणाऱ्या लोकांचा त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांवरही आक्षेप आहे. वेगवेगळ्या लोकांनी आपआपल्या विचारांनी त्यांच्यावर टीका केली. तर काही तुरळक लोकांनी नुसरत आणि मिमिचा बाजू घेतली.

 

View this post on Instagram

 

Remember your dreams and fight for them? #gratitude #Obliged

A post shared by Mimi (@mimichakraborty) on

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A new beginning..!! I thank @mamataofficial and people of my Basirhat constituency to have belief in me..

A post shared by Nusrat (@nusratchirps) on

- Advertisement -

नुसरत आणि मिमिचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल

नुसरत आणि मिमि यांचा टिकटॉक व्हिडिओ दोखील प्रचंड व्हायरल झाला. दिग्दर्शक राज गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर या दोघींचा टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. याशिवाय व्हिडिओमध्ये नृत्य करणाऱ्या अभिनेत्री भारताच्या लोकसभेच्या सदस्य आहेत. देशाची खरच प्रगती होत आहे, असंही ते म्हणाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -