घरमुंबईपायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपचेच पाप - सचिन सावंत

पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपचेच पाप – सचिन सावंत

Subscribe

अभिनेत्री पायल रोहतगी सध्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सतत चर्चेत येत आहे. सोमवारी तिने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केले आहे. त्यामुळे तिच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात टीका होत आहे.

अभिनेत्री पायल रोहतगीने शिवाजी महाराजांवर केलेल्या आक्षेपार्य ट्विटनंतर राजकीय वर्तुळातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळ रोहतगीच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील पायल रोहगीवर टीका केली आहे. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील पायल रोहतगीवर टीका केली आहे. याशिवाय ‘पायल रोहतगीची बेताल बडबड हे भाजपचेच पाप आहे’, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजप पक्षावर देखील टीका केली आहे.

हेही वाचा – पायल रोहतगीच्या ट्विट मागचा ‘बिग बॉस’ शोधायला हवा – शालिनी ठाकरे

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले सचिन सावंत?

‘भाजपने पायल रोहतगीसारख्या अनेक फिल्मी लोकांना ट्विटरद्वारे समाजात द्वेष पसरविणे, विभूतींवर चिखलफेक करणे, त्यांचे चरित्रहनन करणे आणि ध्रुवीकरण करण्याची कामे दिली आहेत. त्यातूनच शिवाजी महाराजांचा अवमान करण्यापर्यंत पायलची मजल गेली. हे पाप भाजपचेच आहे’, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. पायल रोहतगीने शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक ट्विटवर सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहेत. ‘शिवरायांचा अवमान कधीही सहन केला जाणार नाही’, असा इशाराही सावंत यांनी दिला आहे. ‘पायल रोहतगी या अर्धवट बाईने याआधी राजा राममोहन रॉय यांच्याबद्दलही असेच अवमानकारक ट्विट केले होते. सतीप्रथेची भलामणही तीने केली होती. आता या बाईची मजल छत्रपतींबद्दल चुकीची वक्तव्ये करण्यापर्यंत गेली आहे. महापुरुषांबद्दल गरळ ओकणाऱ्या पायल रोहतगी सारख्यांचा बोलवती धनी भाजपाच आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा कमळाचीच सत्ता आल्याने हा चिखल आता जास्तच पसरतोय’, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -