घरमुंबईमहाराष्ट्र काँग्रेस पराभवाची कारणे दिल्लीला पाठवणार

महाराष्ट्र काँग्रेस पराभवाची कारणे दिल्लीला पाठवणार

Subscribe

प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेऊन संपूर्ण अहवाल दिल्लीमध्ये हायकमांडला पाठवण्यात येणार

लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ झाला असून, महाराष्ट्रात फक्त एकच जागा काँग्रेसला जिंकता आली. त्यामुळे लोकसभेमध्ये नेमका पराभव का झाला, त्यामागील कारणे आता हायकमांडला येत्या दोन दिवसात पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नुकतीच मुंबईमध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत नेमका पराभव का झाला याचे चिंतन करण्यात आले. प्रत्येक मतदार संघाचा आढावा घेऊन काँग्रेसला कोणत्या ठिकाणी सर्वाधिक फटका बसला आणि का बसला याचा अहवाल तयार करण्यात आला असून, हा संपूर्ण अहवाल दिल्लीमध्ये हायकमांडला पाठवण्यात येणार आहे.

तुर्तास अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष

दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली असून, ते लवकरच राजीनामा देखील देतील. मात्र हा राजीनामा हायकमांड नाकारण्याची शक्यता आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात येत्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत आणि दुसरे म्हणजे काँग्रेसकडून अजून दुसरे कुणीही प्रदेशाध्यक्ष पदासाठी पुढे आलेले नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुक असल्यामुळे तुर्तास तरी अशोक चव्हाण हेच प्रदेशाध्यक्ष राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

जिल्हा पदाधिकाऱ्यांची होणार बैठक

येत्या ७ आणि ८ जून रोजी काँग्रेसने जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार असून, या बैठकीमध्ये २८८ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच सध्याची प्रत्येक मतदारसंघातील परिस्थिती याचा आढावा देखील घेतला जाणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहेत.


 हे ही वाचा – काँग्रेसच्या बैठकांवर बैठका; आता घेणार मतदारसंघांचा आढावा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -