घरभक्ती2023 मध्ये भाग्योदय व्हावा यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी करा 'हे' दान

2023 मध्ये भाग्योदय व्हावा यासाठी वर्षाच्या शेवटच्या दिवशी करा ‘हे’ दान

Subscribe

2022 मधील शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर शनिवारी असणार आहे. वर्षातील शेवटचा दिवस आणि वर्षाचा पहिला दिवस आनंदात जावा असं प्रत्येकालाच वाटतं. वर्षाच्या शेवट्या दिवशी शनिवार असल्यामुळे शनी देवांना खूश करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. तसेच 2023 देखील आपल्यासाठी चांगले जावे यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, 2023 ची सुरुवात करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी काही गोष्टींचे दान महत्वपूर्ण मानले जातं.

31 डिसेंबरला करा हे दान
वर्षाचा शेवटचा दिवस शनिवारी असणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रानुसार, शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान करणं शुभ मानलं जातं. परंतु शनिवारी कधीही चप्पल खरेदी करु नये. कारण यामुळे शनी देव तुमच्यावर नाराज होतील. मात्र, शनिवार चप्पल दान केल्याने शनी देव लवकर प्रसन्न होतात.

- Advertisement -
  • भगवान शंकराची पूजा करा
    भगवान शंकर शनीदेवांचे गुरू आहेत. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना केल्याने तुम्हाला शनी देवांचा आर्शिवाद सुद्धा प्राप्त होऊ शकतो. प्रत्येक शनिवारी भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करा. तसेच शनिवारी हनुमानाजी देखील पूजा केली जाते. या दिवशी हनुमान चालिसेचं पठण करणं खूप लाभकारी ठरेल.
  • शनिवारी काय करावे? काय करू नये?
    शनिवारी लोखंड, काळी वस्तू , छत्री, उडीद डाळ, चमड्यीची चप्पस कधीही खरेदी करू नये. शनिवारी गव्हाचे दळण केल्याने घरात सुख – समृद्धी प्राप्त होते. शनिवारी कधीही विणाकारण खोटे बोलू नये, तसेच शनिवारी कोणत्याही व्यक्तीला त्रास देऊ नये.
  • भाग्य वृद्धिसाठी करा ‘हे’ उपाय
    शनिवारी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला किंवा गाईला पोळी खाऊ घातल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानले जाते.

हेही वाचा :

Vastu Tips : ‘या’ रंगाचा मासा असतो लकी, फिश टँकमध्ये नक्की ठेवा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -