Horoscope -‘या’ राशीवाल्यांसाठी मोती ठरू शकतो नुकसानकारक

मोती वापरल्यानंतर सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो का? हे समजून घेणेही गरजेचे आहे. कारण मोती हा सगळ्यांसाठीच लाभदायक नसतो.

ज्योतिषशास्त्रानुसार समुद्रात आढळणाऱ्या मोत्यांचा संबंध हा थेट चंद्राशी आहे. जो आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्याचे काम करतो. जर कुंडलीत चंद्र मजबूत असेल तर मन शांत राहते. त्याचबरोबर आपल्या आचरणावर आणि विचारांवरही चंद्राचा प्रभाव असतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना, व्यवहारात होणारा फायदा तोटा हे सर्व आपल्या विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच चंचल मन शांत ठेवण्यासाठी ज्योतिषी मोती वापरण्याचा सल्ला देतात. पण खरंच मोती वापरल्यानंतर सगळ्यांनाच त्याचा फायदा होतो का? हे समजून घेणेही गरजेचे आहे. कारण मोती हा सगळ्यांसाठीच लाभदायक नसतो. तर काहीजणांसाठी तो नुकसानकारक असतो.

वृषभ रास-मोती- शुक्र ग्रह स्वामीस्थानी असलेल्या वृषभेच्या लग्नवाल्यांनी मोती धारण करू नये. कारण त्यांच्यासाठी मोती फायदेशीर नसून नुकसानकारक आहे. वृषभ राशीच्या व्यक्तीने मोती धारण केल्यास त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनपेक्षित खर्च वाढू शकतात. तसेच जवळच्या व्यक्तींबरोबरचे संबंधही बिघडू शकतात.

मिथुन रास-मोती-बुध ग्रह स्वामी असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्तींनी मोती धारण करु नये. त्यामुळे जीवनात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागेल. तब्येतीवरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. या रत्नाच्या प्रभावामुळे व्यक्ती लक्ष्यापर्यंत पोहचू शकत नाही. यामुळे तणाव वाढतो.

सिंह रास- मोती-सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. तर चंद्र यांच्या कुंडलीच्या बाराव्यास्थानाचा स्वामी आहे. यामुळे सिंह व्यक्तीने मोती धारण केल्यास पती पत्नीचे संबंध बिघडतात. आर्थिक अडचणी वाढतात. बचत होत नाही. भावनेच्या भरात पैशांचे व्यवहार करतात त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक फटका बसतो.

धनु रास-मोती-धनु राशीचा स्वामी गुरू आहे. या राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत जर पहील्या स्थानी ९ क्रमांक असेल तर त्यांनी मोती धारण करू नये. धनु लग्नात चंद्र आठव्या स्थानाचा स्वामी असतो. यामुळे मोती धारण केल्याने धनु व्यक्तींचे नुकसान होऊ शकते. शेअर आणि इतर व्यवसायात या व्यक्तींना सतत अपयशाचा सामना करावा लागतो. सर्दी, खोकला अशा आजाराबरोबरच अपघाताचाही धोका या व्यक्तींना मोती परिधान केल्याने होऊ शकतो.

कुंभ रास- मोती-कुंभ राशीचा स्वामी शनि असून या व्यक्तींनी मोती धारण करू नये. कारण कुंभ लग्नात चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी असतो. यामुळे कुंभ राशीने मोती धारण केल्यास शत्रुंचा उपद्याप वाढतो. तब्येत बिघडते. पाण्यापासून आणि अपघातापासून या व्यक्तींना धोका असतो. यामुळे कुंभ राशी असलेल्या व्यक्तीने मोती धारण करू नये.